BAMU : विद्यार्थ्यांचे शुल्कही ऑनलाइन!

Student fees online in BAMU
Student fees online in BAMU

औरंगाबाद -  नोटबंदीनंतर विद्यापीठातील बरेच व्यवहार कॅशलेस झाले होते; मात्र विद्यार्थ्यांशी संबंधित पेमेंट रोख स्वीकारले जात होते. आता विद्यार्थ्यांचे शुल्कही ऑनलाइन स्वीकारले जाणार आहे. यासाठी एसबीआय बॅंक, एमकेसीएलच्या सहकार्याने हे साध्य करणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी
सांगितले. 

डॉ. येवले यांना कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारून 23 ऑक्‍टोबरला 100 दिवस पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.22) डॉ. येवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कुलगुरू म्हणाले, "पदभार घेतल्यानंतर पहिले दोन महिने "डॅमेज कंट्रोल' आणि "रिपेरिंग'साठी दिले. महिन्याभरात आर्थिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय सुधारणा हाती घेतल्या. विद्यार्थ्यांच्या
ऑनलाइन शुल्काची सुरवात महिन्याभरात होईल. मोबाईल, पेटीएमदेखील विद्यार्थ्यांना करता येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी 50 स्किल बेस कोर्सेस डिसेंबरपासून सुरू करण्यात येतील. तीन ते सहा महिन्यांचे हे कोर्स असतील. माती परीक्षणसाठी कोटींची यंत्रे विद्यापीठात पडून आहेत. त्या केंद्राचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा. जनसंवाद विभागाचा स्टुडिओदेखील विद्यापीठाशिवाय इतरांना शुल्क आकारून खुला करण्यात येईल.'' पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्‍ते, कुलसचिव डॉ. साधना पांडे, वित्त व लेखाधिकारी राजेंद्र मडके, संजय शिंदे यांची उपस्थिती होती. 

परदेशी विद्यार्थ्यांसाठी सिंगल विंडो 
परदेशी विद्यार्थ्यांसाठी कुठलेच नियम नव्हते, ते बनविले जाणार असून, त्यांच्यासाठी सिंगल विंडो सुरू करण्यात येईल. त्यांचे नवे वसतिगृह महिन्याभरात सुरू होईल. त्यातच ही सिंगल विंडो असेल. विद्यार्थ्यांना त्यासाठी कुठल्या विभागात वणवण फिरण्याची गरज नाही. 

  
येत्या काही दिवसांत.... 

  • कुलसचिवांसह संवैधानिक अधिकाऱ्यांची पदे दिवाळीनंतर भरणार. 
  • सरकारच्या परवानगीनंतर 67 शिक्षकांच्या पदासाठी जाहिरात. 
  • सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, ह्युमॅनिटीज ऍण्ड सोशल सायन्सेसचे जर्नल. 
  • *सायन्स गॅलरी असलेली मोबाईल व्हॅन सुरू करण्यासाठी उद्योगांशी करार. 
  • उपपरिसरातही अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत सारखेपण असेल. 
  • विद्यापीठात फाइल ट्रॅकिंग सिस्टिम नोव्हेंबरपासून कार्यरत होईल. 
  • रत्नागिरीत इंटर डिसिप्लनरी कोर्स सुरू करण्यात येतील. 
  • जालना येथे स्किल बेस इन्स्टिट्यूट सुरू केले जाईल. 
  • स्वायत्त महाविद्यालयासाठी तीन प्रस्ताव आले. 
  • विविध विभागांत स्वयंचे कोर्सेस सुरू करणार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com