हिंगोली : वसतीगृहातील विद्यार्थी बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

हिंगोली : येथील कारवाडी भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी बेपत्ता झाला असून याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता. 4) साडेअकरा वाजता अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली : येथील कारवाडी भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी बेपत्ता झाला असून याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता. 4) साडेअकरा वाजता अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

येथील कारवाडी भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह आहे. या ठिकाणी औंढा नागनाथ तालुक्यातील दुघाळा येथील रवींद्र सुनील पुंडगे हा विद्यार्थी इयत्ता नववी वर्गात शिक्षण घेतो. मंगळवारी (ता. 4) सकाळी सव्वाआठ वाजता रवींद्र हा वसतीगृहातील आवक जावक रजिस्टरमध्ये गावात जाऊन येतो अशी नोंद करून वसतीगृहा घराबाहेर पडला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत तो वसतिगृहामध्ये मध्ये परत आला नसल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला.

वसतीगृहाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या नातेवाईकांना ही दूरध्वनीवरून संपर्क साधून तो गावी आला का याची माहिती घेतली. मात्र तो गावी पोचला नव्हता. त्यानंतर शहरातील रेल्वे स्थानक बसस्थानक व इतर ठिकाणी त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. त्यानंतर मंगळवारी (ता. 4) रात्री साडेअकरा वाजता रंजीत भराडे यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये रवींद्र पुंडगे हा गावात जाऊन येतो अशी नोंद करून गेला मात्र रात्री पर्यंत आला नाही असे तक्रारीत नमूद केले. त्यावरून हिंगोली शहर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अशोक मैराळ, उपनिरीक्षक टी. एस. गुहाडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: a student is missing from hostel hingoli