पाचव्या मजल्यावरुन उडी मारणाऱ्या सचिन वाघ याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी (ता. 11) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असे सातारा पोलिसांनी सांगितले. सचिनच्या वडीलानी या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सातारा पोलिसांनी माहिती दिली.

औरंगाबाद : महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षेत कॉपी करताना पकडल्यानंतर सचिन वाघ (वय 19) याने महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारली. एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात मंगळवारी (ता. 10) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. यात सचिनचा बुधवारी (ता. 11) मृत्यू झाला.  कमलनयन बजाज रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते.

सचिन हर्सुल येथील नवनाथनगरचा रहिवाशी होता. तो  बीएसस्सी प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.

बीड बायपास येथील एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात मंगळवारी "प्री युनिव्हर्सिटी एक्‍साम' होती. त्यात सचिन "न्युट्रीशन बायोकेमिस्ट्री' विषयाचा पेपर देत होता. पेपरला साडेनऊला सुरवात झाल्यानंतर सव्वादहाच्या सुमारास सचिनला कॉपी करताना पर्यवेक्षकाने पकडले. तसेच प्राचार्य डॉ. हेलन राणी यांच्यासमोर नेण्यात आले. प्राचार्यांनी वडिलांचे मोबाईल नंबर घेतले. मात्र, सचिनने दिलेल्या वडिलांच्या तिन्ही नंबरवर संपर्क होऊ शकला नव्हता. महाविद्यालयाने हे प्रकरण सचिनकडून लिहून घेत सही घेतली. मात्र, आजचा पेपर देता येणार नसल्याचे प्राचार्यांनी सांगितले. त्यानंतर तो पाचव्या मजल्यावरील जिन्यावर जाऊन थांबला. सुमारे दहा मिनिटे तिथेच थांबून त्याने काचेच्या खिडकीतून खाली उडी मारली. त्याला 

रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी (ता. 11) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असे सातारा पोलिसांनी सांगितले. सचिनच्या वडीलानी या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सातारा पोलिसांनी माहिती दिली.

Web Title: student Sachin Wagh dead after he was jumping on building in Aurangabad