भावनिक संदेश लिहून विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

औरंगाबाद - ""मी सर्वांसाठी अन्‌लाईक आहे, सॉरी बाबा मी तुमची चांगली मुलगी होऊ शकले नाही. अस समजा मी जन्मताच मेली.'' असा भावनिक संदेश वडिलांना चिठ्ठीत लिहून बीसीएसचे शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. एक) सकाळी काबरानगर भागात घडली. 

औरंगाबाद - ""मी सर्वांसाठी अन्‌लाईक आहे, सॉरी बाबा मी तुमची चांगली मुलगी होऊ शकले नाही. अस समजा मी जन्मताच मेली.'' असा भावनिक संदेश वडिलांना चिठ्ठीत लिहून बीसीएसचे शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. एक) सकाळी काबरानगर भागात घडली. 

सीमा प्रकाश अडकीने (वय 19, रा. काबरानगर, मूळ नांदेड) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. तिचे वडील रिक्षाचालक असून, काबरानगर येथे ती कुटुंबासह राहत होती. सीमा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात बीसीएसचे शिक्षण घेत होती. पोलिसांनी माहिती दिली की, पहिल्या वर्षात ती दोन विषयांत नापास झाली होती. म्हणून ती हताश होती. मंगळवारी (ता.28) सायंकाळी अभ्यासाला जाते, असे सांगून ती एका खोलीत गेली. कुटुंबीयांनी ती अभ्यास करीत असल्याचे समजून जेवण केले. त्यानंतर ते झोपी गेले. बुधवारी (ता. एक) सकाळ झाल्यानंतरही तिचा दरवाजा बंदच होता. त्यामुळे कुटुंबीयांनी दरवाजावर थाप मारली. मात्र, आतून प्रतिसादच मिळाला नाही. घाबरलेल्या कुटुंबीयांनी आरडाओरड केली. त्यानंतर शेजारी जमा झाले. दरवाजा तोडल्यानंतर सीमाने गळफास घेतल्याचे दृष्य पाहून कुटुंबीय हादरले. दरम्यान, शेजाऱ्यांनी जवाहरनगर पोलिसांना माहिती कळविली. घटनास्थळी पोलिस पोचले. त्यांनी तिला घाटीत दाखल केले असता, डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात झाली. 

रजिस्टरमध्ये लिहिले पत्र 
आत्महत्येपूर्वी सीमाने रजिस्टरमध्येच वडिलांच्या नावे पत्र लिहिले. आत्महत्येनंतर पत्र सहजरीत्या कुटुंबीयांच्या हाती लागावे म्हणून रजिस्टर तिने घरातील जुन्या भिंतीच्या खिडकीत उघडे ठेवले होते. पोलिसांनी घरझडती घेतली, त्यावेळी त्यांच्या हाती रजिस्टरमध्ये लिहिलेले पत्र मिळाले. 

सॉरी पप्पा स्वत:ला सांभाळा 
मी सर्वांसाठी अनलाईक आहे, माझ्या या डिसीजनमुळे सर्वांचे प्रॉब्लेम स्वॉल होतील आणि आता कधीच कोणाला माझ्यामुळे त्रास होणार नाही. हा निर्णय माझा आहे. मी गेल्यावर प्लीज कोणाला माझ्याबद्दल विचारू नका. बस... माझी कधीच आठवण नका काढू. अस समजा की, जन्मताच मेली होती. आणि बाबा सॉरी, मी तुमची चांगली मुलगी बनू शकली नाही. मी गेल्यावर स्वत:ला सांभाळा काळजी घ्या, आणि प्लीज मला माफ करा. 

परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे सीमा हताश होती. तिने चिठ्ठी लिहून गळफास लावून आत्महत्या केली. अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तपास करीत आहोत. 
- मनीष कल्याणकर, पोलिस निरीक्षक. 

Web Title: student suicide