Phulambri News : दप्तर मुक्त शाळेत विद्यार्थ्यांनी अनुभवली विविध कलाकृती

शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून विविध आगळे वेगळे उपक्रम राबविले जातात.
students experienced various art forms Daptar Mukt School education skill
students experienced various art forms Daptar Mukt School education skillSakal

फुलंब्री : शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून विविध आगळे वेगळे उपक्रम राबविले जातात. त्याच धर्तीवर फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथील बोलकर वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेत दप्तर मुक्त उपक्रमात विविध प्रकारची कलाकृती विद्यार्थ्यांनी शनिवारी (ता.३०) रोजी सादर करून भौतिक शिक्षण घेतले.

फुलंब्री तालुक्यात 93 गावे असून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिकच्या सुमारे 205 शाळा आहे. दररोज नित्यनेमाने शाळेत जाण्यासाठी दप्तरांचे ओझे मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने याची दखल घेत दप्तर मुक्त शाळा उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला केलेल्या आहे.

त्याच अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील गाव खेड्यातील शाळेसह वाड्या वस्तीवरील शाळेतील आता दप्तर मुक्त उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमामध्ये आगळे वेगळे उपक्रम शिक्षकांच्या माध्यमातून राबविले जातात. यामध्ये तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळेत रंगरंगोटी करण्यात आली असून आगळे वेगळे उपक्रम राबविण्यावर शिक्षकांचा भर असतो.

त्याच अनुषंगाने फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथील बोलकर वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेत माझी शाळा माजी उपक्रम अंतर्गत शनिवारी दप्तर मुक्त शाळा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलाकृतीच्या माध्यमातून भौतिक शिक्षण घेतले असल्याची माहिती शाळेचे शिक्षक अन्सार अजित शहा यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com