esakal | काय कप्पाळ परीक्षा, धुळीत बसून सोडवला पेपर : Video
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

बीड तालुक्यातल्या एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर बसून पेपर सोडवावा लागल्याचे उघड झाले आहे. 

काय कप्पाळ परीक्षा, धुळीत बसून सोडवला पेपर : Video

sakal_logo
By
चंद्रकांत राजहंस

बीड : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरवात झाली आणि कॉपीबहाद्दरांच्या एकेक सुरस कथा समोर येऊ लागल्या. पण या गोंधळात बीड तालुक्यातल्या एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर बसून पेपर सोडवावा लागल्याचे उघड झाले आहे. 

घाटी रुग्णालयात मोठा फ्रॉड - वाचा 

बीड तालुक्यातील रायमोहा गावात असलेल्या अतुल कला व वाणिज्य महाविद्यालयात बारावीचे परीक्षा केंद्र आहे. पण या ठिकाणी केंद्र देताना येथील भौतिक सुविधांच्या नावाने असलेली बोंब परीक्षा मंडळाने ध्यानात घेतली नव्हती काय, असा सवाल केला जात आहे. इथे विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून पेपर सोडवावा लागला. विशेष म्हणजे, या ठिकाणी साधी फरशीही लावलेली नव्हती. यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेला आजपासून (ता. 18) सुरवात झाली. 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 या कालावधीत बारावीच्या परीक्षा होणार आहेत. औरंगाबाद विभागातील बीड, जालना, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतून 406 केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी एक लाख 71 हजार 959 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. 

पुलाची सेंट्रिंग कोसळली, लोखंडी सळ्या पडून पाच मजूर दबले

केंद्रावर मोबाईल बंदी 

व्हॉट्‌सऍपवरून प्रश्नपत्रिका फुटण्याची शक्‍यता असते. यावर प्रतिबंध आणण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही इलेक्‍ट्रॉनिक साधने व साधा किंवा स्मार्टफोन घेऊन जाण्यास बंदी आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षकांसह केंद्र संचालक, परीक्षक यांना परीक्षाकाळात मोबाईल वापरण्यास बंदी आहे. या सर्वांचे मोबाईल जमा करून एका ठिकाणी ठेवले जाणार आहेत. याबाबत परीक्षा केंद्र चालकांना सक्त सूचना दिल्या आहेत. 

मराठा क्रांती मोर्चामुळे किती विकले गेले झेंडे- वाचा