esakal | शेतकरी कुंटुंबातील मीनाक्षी झाल्या पोलिस उपनिरीक्षक
sakal

बोलून बातमी शोधा

minikshi magar

सिंदगी (ता. कळमनुरी) येथील शेतकरी कुटुंबातील मीनाक्षी मगर यांनी मंगळवारी (ता. १७) जाहीर झालेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळविले. सध्या त्या गुप्त वार्ता विभागात कार्यरत असून त्यांनी गावचे पोलिस पाटील म्हणूनही काम पाहिले.

शेतकरी कुंटुंबातील मीनाक्षी झाल्या पोलिस उपनिरीक्षक

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : सिंदगी (ता. कळमनुरी) येथील शेतकरी कुटुंबातील मीनाक्षी मगर यांनी मंगळवारी (ता. १७) जाहीर झालेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळविले असून गावातून पोलिस उपनिरीक्षक होण्याचा पहिला मान मिळविला आहे. अभ्यासातील सातत्य व पतीची मिळालेली साथ यामुळेच पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळाल्याचे मीनाक्षी मगर यांनी सांगितले.

आजरसोंडा (ता. औंढा नागनाथ) येथील शेतकरी कुंटुंबातील व उच्च शिक्षित असलेल्या मीनाक्षी यांचा विवाह सिंदगी येथील शिक्षक विद्याधर मगर यांच्यासोबत सात वर्षांपूर्वी झाला. मीनाक्षी यांचे शिक्षण एम. ए. बीएड झाले आहे. सासरीदेखील शेती असल्याने त्‍यानी सुरवातीला घरकाम सांभाळात शेतीचे काम केले. परंतु, पतीची साथ मिळाल्याने त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. यातूनच त्यांना वखार महामंडळात नोकरी लागली.

हेही वाचाऔंढा नागनाथ मंदिर ३१ मार्चपर्यंत दर्शनांसाठी बंद

गुप्तवार्ता विभागात अधिकारीपदी रुजू

 परंतु, त्यांनी स्‍पर्धा परीक्षेची तयारीदेखील सुरू ठेवली. घरकाम सांभाळात त्यांनी अभ्यास सुरू केला. त्‍यानंतर सिंदगी येथे पोलिस पाटील पदाच्या जागेवर त्‍यांनी परीक्षा दिली. यात त्या यशस्‍वी झाल्या व गावच्या पोलिस पाटील पदाचा त्‍यांना मान मिळाला. परंतु, यात त्‍या समाधानी नव्हत्या. त्‍यानंतर त्‍यांनी पुणे येथे जावून स्‍पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. नोव्हेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून महिलांमधून त्‍या तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होत गुप्तवार्ता विभागात अधिकारीपदी रुजू झाल्या.

महिला पोलिस उपनिरीक्षक होण्याचा प्रथम  मान

 पुणे येथे त्या प्रशिक्षण घेत आहेत. त्यानंतरही त्‍यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचे थांबविले नाही. २०१८ मध्येच घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाची त्‍यांनी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. १७) जाहीर झाला. यात त्या यशस्‍वी झाल्या आहेत. एका शेतकरी कुटुंबातून घर सांभाळत उच्च शिक्षित असलेल्या मीनाक्षी यांनी अभ्यासातील चिकाटी कायम ठेवत यश मिळविले आहे. त्‍यांच्या यशामुळे त्‍यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सिंदगी गावातून प्रथम महिला पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मानदेखील त्‍यांनी मिळविला आहे.

पतीची साथ मिळाली

काही तरी करून दाखवायची जिद्द मनात होती. त्‍यामुळे घर, शेती सांभाळत अभ्यासाचे सातत्य कमी होऊ दिले नाही. यश मिळत गेले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जास्‍तीत जास्‍त पेपर सोडविण्यावर भर दिला. त्‍याचेदेखील नियोजन केले होते. अभ्यासातील सातत्य, दररोजच्या घडामोडी याकडे लक्ष ठेवल्यास परीक्षेत निश्चितच यश मिळते. माझे पती व कुटुंबीयांची मोलाची साथ मिळाली.
-मीनाक्षी मगर

येथे क्लिक करा‘या’ आजारामुळे संत्र्याला मागणी वाढली अन् भावही वधारले
 
सुशील सरनायक यांची निवड

हिंगोली : तालुक्यातील कनेरगाव नाका येथील सुशील संजयराव सरनायक यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळविले आहे. सेनगाव तालुक्यातील सवना गावचे मूळ रहिवासी असलेले व सध्या कनेरगाव नाका येथे वास्तव्यास असलेल्या संजय सुंदरराव सरनायक यांचा मुलगा सुशील सरनायक यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर झाला असून यात सुशील सरनायक यांनी यश मिळविले आहे. निवड झाल्याचे कळताच कनेरगाव नाका येथे फटाक्यांची आतषबाजी करून मिठाई वाटप करण्यात आली. तसेच सवना येथेही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

loading image
go to top