महा-डीबीटी लाभासाठी कागदपत्रे सादर करा; हिंगोली कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन 

file photo
file photo

हिंगोली : कृषि विभागाने आता महा- डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाव्दारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. 

या प्रणालीव्दारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत विविध बाबींकरिता कृषि यांत्रिकीकरण, ठिंबक संच, तुषार संच, फळबाग लागवड, कांदाचाळ, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, हरितगह, शेडनेट उभारणी यासारखे विविध अर्ज केले होते. त्यानुसार नुकतेच प्राथमिक निवडीचे पुर्वसंमती करीत लॉटरी पध्दतीने संदेश ज्या शेतकऱ्यांना प्राप्त झाले असतील त्या शेतकऱ्यांनी आपला सात बारा, आठ- अ, आधार कार्ड, लागणारे कोटेशन, बँक पासबूक झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर युजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने अपलोड करावीत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी केले आहे.

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पुर्वसंमतीची प्रक्रिया पार पडणार आहे. या पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, विविध योजनेच्या लाभासाठी लागणारी सर्व कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड केल्यानंतरच पुर्व संमती ऑनलाईन पध्दतीने मिळणार आहे. तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे असेही श्री. लोखंडे यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com