अनुदानित हरभरा बियाण्यांचा तुटवडा

file photo
file photo

नांदेड  : रब्बी पेरणीसाठी यंदा चागंला झालेल्या पावसामुळे शेतकरी हरभरा पेरणीकडे वळला आहे. परंतु, बाजारात सध्या अनुदानित हरभरा बियाणाचा तुटवडा भासत अाहे. यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी अतिरिक्त पाच हजार क्विंटल अनुदानित बियाणाची मागणी केल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

यंदा परतीच्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील जलस्त्रोत भरले आहेत. तसेच जमिनीतही पेरणीयोग्य आेलावा झाल्याने शेतकऱ्यांचा हरभरा पेरणीकडे कल वाढला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा पिकाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ६२ हजार हेक्टर आहे. परंतु, यंदा जिल्ह्यात तब्बल अडीच लाख हेक्टरवर हरभरा पेरला जाईल, असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे. यासाठी लागणाऱ्या हरभरा बियाणाची मागणी अचानक वाढल्यामुळे जिल्ह्याला उपलब्ध झालेल्या बियाणे कमी पडत आहे. महाबीजकडून जिल्ह्यासाठी १४ हजार क्विंटल बियाणे पुरविण्याचे मंजूर झाले होते. यापैकी साडेआठ हजार क्विंटल बियाणे आजपर्यंत मिळाले. शिल्लक बियाणेही लवकरच मिळेल, असे महामंडळाकडून सांगितले जात आहे.

शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणाची मागणी केल्यामुळे महाबीजकडून मिळालेल्या बियाणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. या बाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी बियाणे महामंडळाकडे अतिरिक्त पाच हजार क्विंटलची मागणी केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कषी अधिकारी रविशंकर चलवदे, तसेच महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक निकम यांनी दिली. अनुदानित बियाणे सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी ७२ टक्के, तर एसटी व एससी प्रवर्गातील शेतकऱ्यांना २८ टक्के बियाणाचे वाटप करण्यात येते. अनुदानित बियाणे ४५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे उपलब्ध आहे. यामुळे आगामी काही दिवसांत बियाणे उपलब्ध होताचा ती विक्रेत्यांमार्फत पुरवठा केला जाणार अाहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेले हरभरा बियाणे पेरावे. तसेच घरी असलेल्या बियाणाची उगवणशक्ती तपासून पेरणी करता येईल, अशी माहिती श्री. चलवदे यांनी दिली.

महाबीजकडून तालुकानिहाय पुरवठा केलेले बियाणे
(बियाणे क्विंटलमध्ये)
नांदेड ३,६९८, अर्धापूर २०५, मुदखेड १३०, लोहा ५०, कंधार ५५, देगलूर ३५०, मुखेड ४६१, नायगाव ३५४, धर्माबाद २१५, बिलोली ११५, किनवट २०५, माहूर २५, हदगाव १,०२६, हिमायतनगर ५२५, उमरी ७०, भोकर ८०.

प्रात्यक्षिकासाठी बियाणाचे वाटप
शेतकऱ्यांना प्रात्याक्षिकासाठी हरभरा बियाणाचे मोफत वाटप करण्यात येते. यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेंतर्गत १,५९७ क्विंटल, ग्रामबिजोत्पादन योजनेंतर्गत १,५६० क्विंटल, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत ४०, तर आत्मा योजनेंतर्गत ६२ क्विंटल बियाणे वाटपासाठी कृषी विभागाला पुरवठा केल्याची माहिती बियाणे महामंडळाकडून मिळाली.

बियाणे महामंडळाकडे पाच हजार क्विंटल हरभरा बियाणाची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेले बियाणे तसेच घरी असलेल्या हरभरा बियाणाची उगवणशक्ती तपासून पेरणी करावी.- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com