पोलिसांची अशीही माणुसकीही, बीडमध्ये वैद्यकीय सेवेसाठी वाहन 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

बीड पोलिसांची माणुसकीही आता दिसू लागली असून, आपत्कालिन वैद्यकीय सेवेसाठी पोलिसांचे वाहनदेखील उपलब्ध राहणार आहे.

बीड : संचारबंदी काळात रस्त्यावर फिरणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे अशी पोलिसींग करण्याबरोबरच या काळात आपत्कालिन वैद्यकीय सेवेसाठी पोलिसांचे वाहन देखील उपलब्ध राहणार आहे.

वैद्यकीय अडचणीच्या काळात खासगी वाहन उपलब्ध झाले नाही तर १००, १०९१, ०२२४ - २२२३३३ तसेच ०२४२ - २२२६६६ या क्रमांकावर फोन केल्यानंतर जवळच्या पोलिस ठाण्यातील वाहन उपलब्ध होईल, असे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगीतले. दरम्यान, पाल ठोकून राहणाऱ्या मजूरांना माजलगावात शुक्रवारी पोलिसांनी जेवण दिले. 

मोरया प्रतिष्ठान देणार महिनाभराचा किराणा 
बीड : नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या पुढाकाराने शहरातील प्रभाग तीनमधील ४०० मजूरांना पाच किलो गहू, तीन किलो तांदूळ, एक किलो दाळ असा किराणा वाटप करण्यात येणार आहे. पॅकींगचे काम सुरु आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Such is the humanity of the Beed Police