डाॅ.सुदाम मुंडेस चार वर्षे सक्त मजुरी, शासकीय कामात अडथळ्यासह दोन आरोप

अंबाजोगाई न्यायालयाचा निकाल
The court
The court sakal

अंबाजोगाई (जि.बीड) : शासकीय कामात अडथळा आणणे व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून वैद्यकीय व्यवसाय केल्याच्या आरोपात डॉ. सुदाम मुंडे यास दोषी ठरवून येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी चार वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. बुधवारी (ता.२३) न्यायाधीशांनी हा निकाल दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench Of Bombay High Court) महिलेचा गर्भपात करताना मृत्यु झाल्याच्या आरोपात डाॅ.सुदाम मुंडे (Sudam Munde) यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यास जमीन देताना पाच वर्षांसाठी वैद्यकिय व्यवसाय न करण्याचा अटीवर जामीन दिला होता. तरीही त्याने न्यायालयाच्या अटीचे उल्लंघन करून वैद्यकीय व्यवसाय चालू ठेवला होता. (Sudam Munde Get Four Years Sentenced, Ambajogai Court Judgment)

The court
'ईडी, एनसीबी, सीबीआय, पाकिस्तान हे सर्व भाजपच्या प्रचार मोहिमेतील साधने'

याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून बोगस डॉक्टर शोध समितीने परळीतील रामनगर येथे ५ सप्टेंबर २०२० रोजी डाॅ. मुंडे याच्या दवाखान्यावर छापा मारला असता, त्या ठिकाणी चार रुग्ण उपचार घेताना निदर्शनास आले. या छाप्यात वैद्यकीय व्यावसायाचे साहित्य व उपकरणेही सापडली. या छाप्यात तात्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसिलदार डॉ. बिपीन पाटील, डॉ. कुर्गे, डॉ. मेढे हे सहभागी होते. या छाप्या दरम्यान डॉ. सुदाम मुंडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला होता. त्यामुळे डाॅ. मुंडेच्या विरोधात परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. याचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहायक पोलिस निरीक्षक एकशिंगे यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. याची सुनावणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) व्ही. के. मांडे यांच्यासमोर झाली. (Beed)

The court
लाँच पूर्वीच नवीन Mahindra Scorpio चे फोटो आले समोर, मिळतील अनोखे फिचर्स

त्यात सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरून व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस शासकीय कामात अडथळा केल्याच्या चार वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, मेडिकल व्यवसाय कायद्यान्वये तीन वर्षे शिक्षा व इंडियन मेडिकल कौन्सिल कायद्यान्वये एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. अशोक विनायकराव कुलकर्णी यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. नितीन पुजदेकर व कोर्ट पैरवी गोविंद कदम व पोलिस कर्मचारी मंदा तांदळे यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com