भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांच्या चुलत बहिणीच्या कारचा अपघात, पुण्यात मुलाला भेटायला जाताना पती-पत्नी ठार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 February 2021

परिसरातील लोकांनी दोघांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात आणले

बीड : कल्याण-विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गावर गेवराई तालुक्यातील मातोरी गावाजवळ कार अपघातात दाम्पत्य ठार झाल्याची घटना बुधवारी (ता.24) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. ममता तगलपल्लेवार आणि विलास तगलपल्लेवार ( रा.पुसद, जि.यवतमाळ) असे अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

वाचा - संजना जाधव देणार माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना टक्कर? सरपंच, उपसरपंचांच्या सत्काराला लावली हजेरी

ममता या राज्याचे माजी अर्थमंत्री तथा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत भनिगी होत. पुण्यात राहणाऱ्या अतुल या मुलाला भेटण्यासाठी हे दाम्पत्य पुण्याला जात होते. त्यावेळी मातोरीजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. परिसरातील लोकांनी दोघांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात आणले चकलंबा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudhir Mungantiwar Step Sister And Her Husband Died In Accident Beed News