मुख्यमंत्री आल्यावरच सुटेल पीककर्जाची समस्या: मुनगंटीवार

राजेभाऊ मोगल
शनिवार, 16 जून 2018

तेरा कोटी वृक्षलागवडीबाबत जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे शुक्रवारी (ता. 15) सायंकाळी विभागीय बैठक झाली. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. मुनगंटीवार म्हणाले, की विकासदर 5.1 होता. आम्ही गतवर्षी आठ टक्‍क्‍यांपर्यंत तर यंदा 10 टक्‍कापर्यंत नेला.

औरंगाबाद : शेतकऱ्यांना खरिपासाठी पीककर्जाचा पुरवठा केला जात नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरून परत आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे सांगितले. तसेच जिल्हा बॅंकाच अडचणी निर्माण करीत असल्याने त्यांना लवकरच वठणीवर आणू, असा इशाराही त्यांनी दिला. 

तेरा कोटी वृक्षलागवडीबाबत जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे शुक्रवारी (ता. 15) सायंकाळी विभागीय बैठक झाली. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. मुनगंटीवार म्हणाले, की विकासदर 5.1 होता. आम्ही गतवर्षी आठ टक्‍क्‍यांपर्यंत तर यंदा 10 टक्‍कापर्यंत नेला. मराठवाड्यात वनक्षेत्र अत्यल्प आहे. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणरक्षक होण्याची गरज असून, वृक्षलागवडीच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

पेरणीला सुरवात झाली असतानाही बॅंकाकडून पीककर्ज दिले जात नसल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता, ते म्हणाले, शेतकऱ्यांची अडवणूक होत असेल तर बॅंकांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, आमदार अतुल सावे, आमदार नारायण कुचे उपस्थित होते.

Web Title: Sudhir Mungantiwar talked about farmer loan waiver