Nilanga News : कारखाना गावात, मात्र ऊस अडकला शिवारात! ज्या गावाच्या नावावर कारखाना, त्याच गावातील ऊसाला तोडीची प्रतीक्षा!

ज्या गावाच्या नावावर साखर कारखान्याची ओळख निर्माण झाली, त्याच गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आज आपल्या उसाच्या तोडीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
sugarcane

sugarcane

sakal

Updated on: 

निलंगा - ज्या गावाच्या नावावर साखर कारखान्याची ओळख निर्माण झाली, त्याच गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आज आपल्या उसाच्या तोडीची प्रतीक्षा करावी लागत आहे. गावाच्या मातीत उभा राहिलेला कारखाना सुरू असताना गावातीलच शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा असल्याचे चित्र समोर येत आहे. हा प्रकार हलगरा ता. निलंगा येथी हनुमान खांडसरी शुगर मिल्स या कारखाण्याकडून होत आहे. बुधवारी ता. 25 रोजी हलगरा ता. निलंगा या गावातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत कारखाना प्रशासनाला जाब विचारून घेराव घातला.

Loading content, please wait...