esakal | ऊस बिलाचे चेक बाऊन्स ; शेतकरी मानसिक तणावात
sakal

बोलून बातमी शोधा

sugarcane

ऊस बिलाचे चेक बाऊन्स ; शेतकरी मानसिक तणावात

sakal_logo
By
दिलीप गंभिरे

कळंब : तालुक्यातील हावरगाव येथील डीडीएन शुगर युनिट दोन या साखर करखान्याने पाच सहा महिन्यांचा काळ उलटला तरी शेतकऱ्याना ऊस बिले दिली नाहीत. त्याचा मोठा फटका शेतकऱ्याना बसत असून ऑगष्ट महिन्यात बऱ्याच शेतकऱ्याना धनादेश दिले आहेत. मात्र,खात्यावर पैसे नसल्याने धनादेश वटले नसल्याचे समोर आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामाचा दाम कधी मिळणार असे सवाल शेतकरी उपस्थित करत असून कारखान्याने ऊस बिले थकविल्याने शेतकरी मानसिक तणावात आहेत.

तालुक्यातील शेतकऱ्यासह बीड, लातूर, सोलापूर आदी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यानी तुळजापूर भाजप आमदार रानाजगजितसिंह पाटील, लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील दिलीप नाडे, विजय नाडे यांच्याकडे बघून आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तालुक्यातील हावरगाव येथील नाडे बंधूच्या डीडीएन शुगर युनिट या कारखान्याला उसाचा पुरवठा केला.

हेही वाचा: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

फेब्रुवारी २०२१ पासून शेतकऱ्याची कोटींची ऊस बिले थकविली आहेत. तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखाण्याने पैसे थकविले असल्याची माहिती समोर आलीय. हावरगावच्या डीडीएन कारखान्याने ऑगष्ट महिन्यात तीन कोटी रूपये च्या जवळपास शेतकऱ्याना धनादेश वाटप केले.खात्यावर रक्कम नसल्याने वटले नाहीत. फेब्रुवारी महिन्यापासून ऊस बिले थकली आहेत. ऊसाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी  मानसिक तणावात आहेत. ऊस वाहतुकदारांचे ही कोट्यवधी रुपये थकल्याची माहिती समोर येत आहे.

शेतकऱ्याच्या आक्रमकतेमूळे धनादेश वाटप;

मागच्या महिन्यात साखर कारखानास्थळी ऊसाची बिले देण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकऱ्यानी गोंधळ घातला होता. पाच सहा महिने उलटूनही ऊस बिले मिळत नाहीत,कारखान्याच्या व्यवस्थापनाला भेटावे तर वॉचमन भेट घेऊ देत नाही. त्यामुळे शेतकरी गोंधळून गेले होते. बीड तसेच तालुक्यातील मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यानी ऊस बिलासाठी कारखान्यावर गोंधळ घातला होता.त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील तारखा टाकून शेतकऱ्याना धनादेश दिले होतें. धनादेश वटले नसल्याने शेतकरी मानसिक तणावात आहेत.

loading image
go to top