
शेतकरी हे दुपारी दिडच्या सुमारास शेताकडे गेले असता शेतातील उभा चार एकर वरील ऊस जळून खाक झाला होता
जळकोट (जि.लातूर) : मंगरुळ शिवारीत एका शेतकऱ्यांचा अज्ञात व्यक्तीने ऊस पेटून दिल्याने शेतकऱ्यांचे पाच लाख रुपायचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी (ता.२९) दुपारी दीडच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगरुळ ता.जळकोट येथील शेतकरी शेख मोहम्मद जाकीर यांच्या गट क्रमांक २८० मध्ये चार एकर ऊसाची लागवड करण्यात आली होती. शेतकरी हे दुपारी दिडच्या सुमारास शेताकडे गेले असता शेतातील उभा चार एकर वरील ऊस जळून खाक झाला होता.
नुसता धुरळा! अकरावीतील मुलाने आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल
आठ दिवसांत सदरील शेतकरी ऊस कारखान्याकडे देणार होता. पंरतू अज्ञात इसमाने ऊस पेटवून दिल्याने शेतकऱ्यांचे पाच लाख रुपायचे नुकसान झाले आहे. सदरील शेतकरी यांनी आपल्या शेतात विद्युत पुरवठा नसल्यामुळे ऊस शार्टसर्किटमुळे जळाला नसल्याचे सांगितले. सदर घटना ही अज्ञात इसमाने केल्याचा आरोप केला आहे. याबाबत अर्ज करुन तहसीलदार यांना कळविल्याचे त्यांनी सांगितले.
(edited by- pramod sarawale)