Sugarcane Harvester machine
sakal
शेंदूरवादा - गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा परिसरात ऊसतोडणीचा हंगाम जोरात सुरू असून, ऊसतोडणी हार्वेस्टर चालक आणि साखर कारखान्यांच्या कर्मचारी मार्फत शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांकडून एकरी चार ते नऊ हजार रुपयांपर्यंतची अतिरिक्त रक्कम अनधिकृतपणे वसूल केली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. 25) गंगापूर येथील तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.