Kaygaon News : कायगाव परिसरात ऊसतोडणी हंगामाची चाहूल; ऊसतोड मजूर दाखल, मात्र दुष्काळाने उसाची वाढ खुंटली, उत्पादन घटणार

गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून मजूर बैलगाड्या व ट्रॅक्टरसह दाखल होत आहेत. शेतातच कोप्या उभारून संसार थाटण्यासाठी ते परिश्रम घेत आहेत.
Sugarcane Cutting Laborers

Sugarcane Cutting Laborers

sakal

Updated on: 

कायगाव - कायगाव (ता. गंगापूर) परिसरात ऊस गळीत हंगामाची चाहूल लागली असून, गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून मजूर बैलगाड्या व ट्रॅक्टरसह दाखल होत आहेत. शेतातच कोप्या उभारून संसार थाटण्यासाठी ते परिश्रम घेत आहेत.

मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे उसाची वाढ खुंटली असून उत्पादनाच्या सरासरीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे यंदाचा गाळप हंगाम लवकर संपण्याची चिन्हे आहेत. मात्र उसाचा चांगला भाव वाढून द्यावा, अशी ऊस उत्पादक शेतकरी मागणी करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com