Waluj Police : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शेंदूरवादा येथे ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर; वाळूज पोलीस आणि साखर कारखान्याचा संयुक्त उपक्रम

Sugarcane Transport Vehicle Safety : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलींचे अपघात रोखण्यासाठी वाळूज पोलिस आणि मुक्तेश्वर शुगर मिलतर्फे रिफ्लेक्टर व आवश्यक सुरक्षा साधने बसविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
Sugarcane Transport Vehicle Safety

Sugarcane Transport Vehicle Safety

esakal

Updated on: 

शेंदूरवादा: रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात रोखण्यासाठी वाळूज पोलीस ठाणे आणि मुक्तेश्वर शुगर मिल, वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम गुरुवारी (ता.12) राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रॉलींना रिफ्लेक्टर तसेच आवश्यक सुरक्षा साधने बसविण्यात आली.

Loading content, please wait...