CNG Production : ऊसाचे पाचट जाळण्याऐवजी गट्टू तयार केले, आता त्यातून सीएनजी, जनावरांना चारा आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न; कायगाव परिसरात सेंद्रिय शेतीला चालना

Sugarcane Waste to CNG and Organic Farming : ऊसतोडीनंतर शेतात उरलेल्या पाचटापासून सीएनजी, जनावरांसाठी चारा आणि अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. पाचट न जाळता गोळा करण्याच्या पद्धतीमुळे खोडवा वाचत असून प्रदूषणही टळत आहे.
Sugarcane Waste to CNG and Organic Farming

Sugarcane Waste to CNG and Organic Farming

esakal

Updated on: 

कायगाव : टाकाऊ पाचटातून आता टिकाऊ संपत्ती तयार होत आहे. ऊस तुटल्यानंतर शेतात पडलेलं पाचट जाळलं तर कोंब जळतात, प्रदूषण होतं. पण तेच पाचट गोळा केलं तर त्यापासून सीएनजी तयार होतो, दुष्काळात जनावरांना सुका चारा मिळतो आणि शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न मिळतं. त्यामुळे कायगाव (ता. गंगापूर) परिसरातील शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे सरसावले आहेत.

गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठ परिसरात उसाचे मोठे क्षेत्र आहे. गणेशवाडी (ता. गंगापूर) येथील शेतकरी अनिल बारकू कळसकर यांनी आपल्या अमळनेर शिवारातील पाचट गट्टू करण्यासाठी दिलं आहे. आता त्यांच्या शेतात छान गट्टू तयार झाले आहेत. शिवाय उसाचा जोमदार फुटवा देखील होतो. कायगाव परिसरातून राजस्थानी गाई चारणारे लोकही हेच पाचट, उगाल, उसाच्या खोडक्या गोळा करून नेतात.

Loading content, please wait...