esakal | छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची परळीत आत्महत्या!
sakal

बोलून बातमी शोधा

crime logo.jpg

घराजवळ राहणाऱ्या तरूणाकडून सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. १८) सायंकाळी शहरातील सावतामाळी नगर येथे उघडकीस आली. याप्रकरणी त्या रोडरोमिओवर विनयभंग करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची परळीत आत्महत्या!

sakal_logo
By
प्रा. प्रविण फुटके

परळी (बीड) : घराजवळ राहणाऱ्या तरूणाकडून सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. १८) सायंकाळी शहरातील सावतामाळी नगर येथे उघडकीस आली. याप्रकरणी त्या रोडरोमिओवर विनयभंग करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सावतामाळी नगर भागातील या अल्पवयीन मुलीच्या घराजवळ राहणारा मंगेश भास्करराव कोपनबैने (वय २९) हा तरूण तिला मागील वर्षभरापासून सतत त्रास देत होता. मंगेश नेहमी तिचा पाठलाग करून बोलण्यासाठी आग्रह धरत असे आणि मोबाईल नंबर मागून तिची छेड काढत होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हा सततच्या त्रास असह्य झाल्याने अंजलीने अखेर बुधवारी सायंकाळी राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली असे तिचे वडील केशव रंगनाथ नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. सदर फिर्यादीवरून मंगेश कोपनबैने याच्यावर संभाजीनगर पोलीस ठाण्यात कलम मृत्यूस कारणीभूत ठरल्यासह विनयभंग व पोस्को पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास फौजदार सी. एच. मेंडके करत आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)