'बदलीसाठी आत्महत्या किंवा राजीनामा हाच पर्याय'

Suicide or resign is the option for transfer'
Suicide or resign is the option for transfer'

हिंगोली - हिंगोली जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी बदलीसाठी कुटुंबासह आत्महत्या किंवा नोकरीचा राजीनामा हे दोनच पर्याय शिल्लक असल्याचे सांगत उद्विग्नता व्यक्त केली आहे. सन 2016 मध्ये मुंबई येथून पोलिस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळालेल्या श्रीमती पाटील यांनी हिंगोली येथील पोलिस उपअधीक्षक म्हणून पदभार घेतला त्यानंतर त्यांनी वेळोवेळी मुंबई येथे बबदलीसाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे अर्जही दिले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही अर्ज दिले. मात्र त्यांचा अर्जाचा विचार करण्यात आला नाही. 

सांगली येथे अनिकेत कोथळे याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाल्यानंतर पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली. राज्यभरातून पोलिस प्रशासनावर टीका होत असताना श्रीमती पाटील यांनी अनिकेत कोथळे यांची तीन वर्षाची मुलगी दत्तक घेऊन पोलिसांमध्ये अद्यापही माणुसकी शिल्लक असल्याचे दाखवून दिले. मात्र श्रीमती पाटील यांना बदलीसाठी प्रशासनाशीच झगडावे लागत आहे. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहिले असून त्यात बदलीसाठी होणारा त्रास यामुळे उद्विग्नता व्यक्त केली. त्यांचे कुटुंब मुंबईत राहत असून मुंबई व हिंगोली या दोन्ही घरांचा खर्च यामुळे कर्जबाजारी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या धोरणामुळे आपले मानसिक खच्चीकरण होत असून आता आत्महत्या किंवा पदाचा राजीनामा हे दोनच पर्याय शिल्लक असल्याचे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

यासंदर्भात, पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी मानसिक खच्चीकरण होत असल्याचे स्पष्ट करून किमान आपली बदली गडचिरोली केल्यास तेथे शहीद झाल्यानंतर आपल्या कुटुंबियांचे भले होईल असे सांगत प्रशासनाबद्दलचा रोष व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com