थेट राज्यपालाकडे आत्‍महत्‍येची परवानगी

file photo
file photo

सेनगाव (जिल्हा हिंगोली) :  परतीच्‍या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले असून प्रशासनाने अद्याप शेतकऱ्यांना मदत दिली नाही. तसेच बँकांनी पीककर्ज दिले नाही. आता खासगी फायनान्सकडून सक्‍तीने कर्ज वसुली केली जात असल्‍याने आत्‍महत्‍या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकऱ्याच्‍या मुलाने बुधवारी (ता.१३) केली आहे.

ताकतोडा येथील नामदेव पतंगे यांनी तहसील प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. राज्‍यातील राजकीय परिस्‍थिती अस्‍थिर असून परतीच्‍या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असताना मदत मिळाली नाही. बहुतांश शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज वाटपासाठी दिरंगाई झाली. त्‍यामुळे खासगी फायनान्सकडून जादा व्याजदराने शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. या फायनान्सकडून आता सक्‍तीने वसुली केली जात आहे.

तालुक्‍यातील दोन शेतकऱ्यांनी या आठवड्यात नापिकीला कंटाळून आत्‍महत्‍या केली. कर्जाच्‍या ओझ्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्‍यामुळे आत्‍महत्‍या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नामदेव पतंगे यांनी तहसीलदारामार्फत राज्‍यपाल भगतसिंग कोशारी यांच्‍याकडे केली आहे.


हे ही वाचा...


विहिरीच्‍या कामाची नोंद घेण्यासाठी मागितली लाच

हिंगोली : औंढा नागनाथ येथे सिंचन विहिरीचे मोजमाप करून मोजमाप पुस्तिकेत नोंद घेण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पंचायत समितीच्‍या कृषी अधिकाऱ्यावर औंढा पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.१२) रात्री उशिरा गुन्‍हा दाखल झाला आहे.


औंढा तालुक्‍यातील काकडदाभा येथील एका शेतकऱ्याच्‍या वडिलाच्‍या नावे पिंपळदरी शिवारात विहीर मंजूर झाली होती. या विहिरीचे खोदकाम झाल्‍यानंतर मोजमाप करून त्‍याची मोजमाप पुस्‍तिकेत नोंद घेण्यासाठी व विहिरींचे अनुदान वडिलांच्‍या बँक खात्‍यात जमा करण्यासाठी कृषी अधिकारी सिद्धार्थ खंदारे याने दहा हजार रुपये देण्याची मागणी केली होती.

 ही रक्‍कम मंगळवारी (ता.१२) औंढा पंचायत समिती कार्यालयात आणून देण्याचे ठरले होते. मात्र, संबंधित लाभार्थीने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. लाचलुचपतचे उपअधीक्षक हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, ममता आफुने, सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री. बुरकुले, जमादार अभिमन्यू कांदे, सुभाष आढाव, विजय उपरे, विनोद देशमुख, संतोष दुमाने, रुद्रा कबाडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, तान्‍हाजी मुंडे, अविनाश कीर्तनकार, प्रमोद थोरात, हिंमतराव सरनाईक यांच्‍या पथकाने मंगळवारी (ता.१२) औंढा येथे सापळा रचला होता. मात्र संबंधित कर्मचाऱ्याला संशय आल्‍याने त्‍याने लाचेची रक्‍कम स्‍विकारली नाही. या प्रकरणी औंढा पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com