बीएसएफच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या

बीएसएफच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या

चाकूर (लातूर) : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) प्रशिक्षण केंद्रात कॉन्स्टेबल असलेल्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.27) पहाटे घडली आहे, जवान पश्चीम बंगाल राज्यातील असून त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रातील दारुगोळा भंडार जवळ जवान रात्रीच्या वेळी गस्त घालत होते यावेळी बंदुकीतून गोळी उडाल्याचा आवाज आल्यामुळे अन्य जवान त्याठिकाणी आले असता कॉन्स्टेबलने बंदुकीने हनुवटीजवळ गोळी झाडून घेतल्याचे आढळून आले. जवानांनी त्यास प्रशिक्षण केंद्रातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्या डोक्यातून जास्त रक्तस्त्राव होत असल्यामुळे त्यास चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

येथील डाॅक्टरांनी त्याची तपासणी करून त्यास मृत घोषित केले. याबाबत निरीक्षक राजेशकुमार कश्यप यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. लिटनरॉय प्रमाणिक हा पश्चिम बंगाल राज्यातील छोटो पिंजारझार (जि. कुछबिहार) येथील रहिवाशी असून शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह गावी पाठविण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com