विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

विलास शिंदे
बुधवार, 15 जानेवारी 2020

विद्यार्थ्याच्या खिशात मोबाईल व चिठ्ठ्या आढळून आल्या. याद्वारे आई-वडील व इतरांना मनातील भावना बोलून दाखविल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्याचे समजते. मोबाईलद्वारे बुधवारी पहाटे साडेचार वाजता संदेश पाठविण्यात आल्याचे समजते. यावरून सदरील घटना बुधवारी सकाळी साडेचार ते सात वाजेच्या दरम्यान घडली.

सेलू (जि.परभणी) : येथील कै. वामनराव कदम बोर्डीकर कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. १५) सकाळी सात वाजता उघडकीस आली. 

येथील कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कानिफनाथ परसराम धोंडे (वय २१, रा. आष्टा हरिनारायण, ता. आष्टी, जि. बीड) या विद्यार्थ्याने बुधवारी सेलू-परभणी रस्त्यावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. सदरील विद्यार्थ्याच्या खिशात मोबाईल व चिठ्ठ्या आढळून आल्या. याद्वारे आई-वडील व इतरांना मनातील भावना बोलून दाखविल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्याचे समजते. मोबाईलद्वारे बुधवारी पहाटे साडेचार वाजता संदेश पाठविण्यात आल्याचे समजते. यावरून सदरील घटना बुधवारी सकाळी साडेचार ते सात वाजेच्या दरम्यान घडली असावी. आत्महत्याचे कोणतेही कारण स्पष्ट होत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे सेलू पोलिस ठाण्यात घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. येथील उपजिल्हा रुग्णालायत उत्तरीय तपासणी करून पार्थीव नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक विजय रामोड, पोलिस कर्मचारी संजय साळवे, रवी मगरे हे करीत आहेत. 

हेही वाचा - सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न लांबच

आत्महत्याची दुसरी घटना
येथील कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची दुसरी घटना आहे. यापूर्वीदेखील एका विद्यार्थ्याने याच पद्धतीने आपले जीवन संपविल्याची घटना घडली होती. ऐन मकरसंक्रांतीच्या दिवशीच विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्यामुळे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी हळहळ व्यक्त करत होते. तसेच आत्महत्याग्रस्त विद्यार्थी कानिफनाथ धोंडे याच्या कुटुंबीयांवरदेखील संक्रांतीच्या दिवशी दु:खाचा डोंगर कोसळला. त्यामुळे कृषी महाविद्यालय व धोंडे कुटुंबीय यांच्यासाठी दु:खदायक संक्रांत ठरली.

हेही वाचा - अस्वलाने तोडले शेतकऱ्याच्या कानाचे लचके

गुणवाण विद्यार्थी : प्राचार्य राऊत 

कानिफनाथ धोंडे हा अभ्यासात हुशार होता. कृषी महाविद्यालयात नियमितपणे उपस्थित होता. मंगळवारीही (ता. १४)  तो महाविद्यालयात आला होता. त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला असावा, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.  विद्यार्थ्यांसमोर कुठलीही समस्या उभी राहिली तरी त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे अावाहन प्राचार्य एस. एस. राऊत यांनी केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide by student slump