तरुण व्यावसायिकाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

औरंगाबाद - कोणताही आजार नसताना आजार झाल्याचा भास होत राहिल्याने भीतीपोटी एका तरुण व्यावसायिकाने गळाफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. सहा) दुपारी विशालनगर भागात उघडकीस आली. गोपाल भगवान राजपूत (वय 35, रा. वाळूज) असे मृताचे आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपूत यांचे वाळूज औद्योगिक वसाहतीत प्रिंटिंग प्रेस युनिट आहे. विविध कंपन्यांच्या बॉक्‍स प्रिंटिंगची कामे ते करायचे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना काहीतरी आजार जडल्याचे वाटत होते. लक्षात येईल तो आजार झाल्याचे ते कुटुंबीयांना सांगत होते. डॉक्‍टरकडे दाखविल्यावर त्यांना काहीच झाले नसल्याचे समोर आले. तरीही त्यांना भीती वाटतच होती. शनिवारी ते पत्नी व दोन मुलांसोबत विशालनगरमध्ये राहणाऱ्या नातेवाइकाकडे गेले होते. तिथे जेवल्यानंतर ते मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणार होते; मात्र त्यांनी लवकर जेवण आटोपत खालच्या मजल्यावरच्या खोलीत आले. आतून दरवाजा लावून त्यांनी गळफास घेतला. 

कुटुंबातील महिलांचे जेवण झाल्यावर दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्या पत्नीने खाली येऊन दरवाजा ठोठावला; मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर नातेवाइकांनी पुंडलिकनगर पोलिसांना माहिती देत दरवाजा तोडला. राजपूत यांना घाटी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्‍टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Suicides of young businessman