उन्हाने घटविला मतदानाचा टक्का

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

लातूर - महापालिकेच्या ७० जागांसाठी बुधवारी (ता. १९) सकाळी ७.३० पासून मतदानाला सुरवात झाली. सकाळच्या सत्रात मतदारांचा प्रतिसाद मिळाला; मात्र दुपारच्या कडक उन्हामुळे मतदानावर परिणाम झाला. सायंकाळी ६.३० पर्यंत अंदाजे सरासरी ५८ टक्के मतदान झाले. शेवटच्या टप्प्यातसुद्धा मतदारांत उत्साह दिसून आला नाही. 

महापालिकेच्या १८ प्रभागांतील अ, ब, क व ड गटातून एकूण ७० सदस्यांच्या निवडीसाठी ४०१ उमेदवार निवडणूक लढत आहेत. शहरातील १८ पैकी १६ प्रभागांतून प्रत्येकी चार व दोन प्रभागांतून प्रत्येकी तीन उमेदवारांसाठी ३७१ मतदान केंद्रांत मतदान झाले. याची मतमोजणी शुक्रवारी (ता. २१) सकाळी दहापासून बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन येथे होणार आहे. 

बुधवारी सकाळी ७.३० पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळी ९.३० पर्यंत आठ टक्के, सकाळी ११.३० पर्यंत २३.९० टक्के, दुपारी १.३० पर्यंत ३२ टक्के व ३.३० पर्यंत ३९.४९ आणि ५.३० पर्यंत ५१ टक्के मतदान झाले. सकाळपासून मतदानाचा वेग कमी होता. दुपारच्या कडक उन्हामुळे मतदान थंडावले. सायंकाळी ६.३० पर्यंत सरासरी अंदाजे ५८ टक्के मतदान झाले. पालिकेचे दोन लाख ७८ हजार ३७४ मतदार असून, एक लाख ४६ हजार ५६१ पुरुष, तर एक लाख ३१ हजार ८१३ स्त्री मतदार आहेत. 

या निवडणुकीत कार्यकर्त्यांची फोडाफोडी, राजकीय दबाव, पैसा व दारूचा मोठा वापर झाला. काही ठिकाणी वाद व भांडणे झाली. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त वाढवावा लागला. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही; मात्र काँग्रेसने पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरावर भाजपचा झेंडा असल्याची ध्वनिचित्रफीत काढली. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे काँग्रेसने तक्रार केली आहे.

Web Title: Summer effect on voting