पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांची औरंगाबादला बदली

meena
meena

नांदेड : जिल्ह्यात गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळख असलेले आणि पोलिस भरती प्रक्रियेतील गोरखधंदा उघडकीस आणून अनेकांना कारागृहात पाठविणारे पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनी औरंगाबाद येथे उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर मुंबई येथून संजय जाधव हे येत आहेत. 

राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील आणि राज्य सेवेतील एकूण 121 उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.  त्यात नऊ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. तर तीन अधिकाऱ्यांना तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. नांदेडच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी फत्तेसिंह पाटील, पोलीस अधीक्षकपदी संजय जाधव आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी अक्षय शिंदे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. चंद्रकिशोर मीना यांना औरंगाबाद शहरात उपआयुक्त पदावर पाठवण्यात आले आहे. 

शासनाने शुक्रवारी (ता. 28) रात्री राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या आणि नवीन पदस्थापना जाहीर केल्या आहेत. त्यात नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर फत्तेसिंह पाटील यांना नियुक्ती देण्यात आली आहे. फत्तेसिंह पाटील सन 2005- 2007 या काळात नांदेडचे पोलीस अधीक्षक होते. नांदेडच्या पोलीस अधीक्षकपदी संजय जाधव यांना पाठवण्यात आले आहे. जाधव हे सन 1999 ते 2001 या काळात देगलूर पोलीस उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक होते. नांदेडच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी अक्षय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

नांदेडचे  पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना औरंगाबाद शहरात पोलीस उपायुक्त झाले आहेत. नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांना पुणे शहरात पोलीस उपायुक्त पदावर पाठवण्यात आले आहे. भोकर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना दहशहतवाद विरोधी पथक औरंगाबाद येथे पोलीस अधीक्षक पदावर पाठवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com