पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी हेच मोठे गुंड....कोण म्हणाले ते वाचा

SVD_6805 copy.jpg
SVD_6805 copy.jpg

नांदेड : पोलिस अधीक्षक अाणि जिल्हाधिकारी हेच जिल्ह्यातील सर्वात मोठे गुंड आहेत. ते एकत्र आले तर इतर गुंड पुढे येणार नाहीत, असे प्रतिपादन नुतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले. या उपहासात्मक बोलण्याला उपस्थितांनीही तेवढीच दाद दिली.

निरोप व स्वागत समारंभ
महसूल परिवार तसेच विविध संघटनांकडून शुक्रवारी (ता.२८) शहरातील कुसुम सभागृहात अरुण डोंगरे यांना निरोप, तर नूतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, अंजली डोंगरे यांच्यासह उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

विकास कामे सुरु राहतील
नूतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्वागत स्वीकारल्यानंतर अरुण डोंगरे यांची राज्यात चांगले अधिकारी म्हणून ओळख असल्याचे सांगत जिल्ह्याचा विकास करताना श्री. डोंगरे यांचे मार्गदर्शन घेऊन केला जाईल, असे सांगितले. ‘सीइओं’च्या मदतीने त्यांच्या काळातील निवडणूक, दुष्काळ, विकास आदी चांगल्या कामाची स्पर्धा करणार, असे डॉ. विपीन यांनी सांगीतले. 

सामान्यांसह शेतकऱ्यांना केंद्रबिंदु मानले
जिल्हाधिकारी म्हणून तीन वर्षात प्रशासकीय काम करताना सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानले. त्यांचा आवाज एकण्याचे काम करताना जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीला न्याय देण्याचे काम केल्याचे प्रतिपादन तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.

व्यापक हितासाठी नियम बाजुला ठेवू
श्री. डोंगरे यांनी नांदेडला पहिल्यांदा जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय काम करताना सर्वांना सोबत घेऊन काम केले. सर्वसामान्य व शेतकरी कामाचा केंद्रबिंदू मानला. त्यांच्या समस्या प्रथम सोडविण्याचे काम केले. गावातील नागरिक त्याचे गावात कोणी एकत नाही म्हणून जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला येतो, त्यांना आपण भेटणार नाही तर कोण भेटेल, असा प्रश्न करून पदाच्या खुर्चीला महत्त्व देऊन सामान्यांना न्याय देण्याचे काम केले पाहिजे. लोकांना दिलेल्या कामाचे आश्वासन इतरांप्रमाणे न विसरता ते आधी पूर्ण केले पाहिजे, असे ते म्हणाले. जिल्ह्यात कृषी, महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात काम करता आले. 

शेतकऱ्यांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे
शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रशासनाने प्रोत्साहन देण्याचे काम केले. यातून जलयुक्त, बीजोत्पादन, शेततळी यासारखी कामे झाली पाहिजे. शेतकरी स्वत:च्या पायावर उभे राहिले, असे सांगत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी ठरविलेले काम झाले पाहिजे, ते नियमात बसो अथवा न बसो असे सांगत त्यांनी राज्यपालांच्या कामाचा हवाला दिला. नूतन जिल्हाधिकारी नागपूरचे असल्याने विकास सुरू राहील. उज्वल नांदेड, होट्टल महोत्सव आदी उपक्रम सुरू ठेवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रारंभी विकास हा जगन्ननाथाचा रथ असल्यामुळे तो पुढे चालू राहील, असे सांगत जिल्हाधिकारी म्हणून काम करताना सर्वाचे सहकार्य लाभले. 

कुंटूबाचे मिळाले सहकार्य
पत्नी व मुलीच्या सहकार्यामुळे कामासाठी अधिकचा वेळ देता आला. सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल-रुक्मिणी, माहूरची रेणुकादेवी, गुरू गोविंदसिंघजी यांच्या सेवेनंतर आता शिर्डीला गुरूची सेवा करण्याचे भाग्य लाभले. या वेळी सत्कार समिती तसेच उपस्थितांकडून अरुण डोंगरे तसेच डॉ. विपीन यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. खल्लाळ, सूत्रसंचालन निळकंठ पाचंगे यांनी केले, तर आभार लक्ष्मण नरमवार यांनी मानले. मानपत्राचे वाचन स्वाती देशपांडे यांनी केले.




 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com