esakal | गरजू, कामगारांना अन्न धान्याचा पुरवठा : माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर

बोलून बातमी शोधा

Jayprakash Dandegaonkar

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सुरू आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे बंद झाले आहे. यामुळे रोजमजुरी करणाऱ्यांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने अन्नधान्य पुरविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती श्री. दांडेगावकर यांनी दिली. 

गरजू, कामगारांना अन्न धान्याचा पुरवठा : माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वसमत (जि. हिंगोली) : वसमत शहरातील मजूर, कामगार, गरजू नागरिकांना पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून दहा टन तांदूळ, गहू अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत अन्न धान्याचा पुरवठा तहसील प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली रेशन दुकानदारांना वितरित करण्यात आला असल्याची माहिती माजीमंत्री तथा पूर्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली. 

कोरोना संसर्गापासून बचावासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने हातावर पोट असणाऱ्या मजूर, कामगार, गोरगरीब नागरिकांना पूर्णा साखर कारखान्याच्या माध्यमातून दहा टन तांदूळ, गहू, अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय पूर्णा प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा - वाहतूक पोलिस कर्मचारी देणार ८१ दिवसांचे वेतन

रेशन दुकानदारांना वितरित

अन्न धान्याचा पुरवठा तहसील प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली रेशन दुकानदारांना वितरित करण्यात आला आहे. प्रत्येकी तीन किलो गहू, तीन किलो तांदूळ या स्वरुपात शहरात धान्याचे वाटप सुरू असून नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन पूर्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले आहे.

सामाजिक संस्थांचाही पुढाकार

 सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सुरू आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे बंद झाले आहे. यामुळे रोजमजुरी करणाऱ्यांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने अन्नधान्य पुरविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती श्री. दांडेगावकर यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला असून गरजूंना मदत केली जात आहे. त्यामुळे गरजूंमधून समाधान व्यक्त केले जात आहे.    

उद्योग, कारखाने ३१ मार्चपर्यंत बंद राहणार

हिंगोली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील उद्योगधंदे, कारखाने ( ता.३१) मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून साथरोग कायदा (ता.१३) मार्चपासून लागू करण्यात आला आहे. मात्र, औद्योगिक संस्था, कारखाने, उद्योग धंदे आदी व्यवसाय सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित आस्थापनेवरील कामगार, कर्मचारी वाहतूक करण्यासाठी येत आहेत. 

येथे क्लिक कराहिंगोलीत आढळला कोरोना संशयित डॉक्टर

आरोग्य विषयक कंपन्यांना वगळले

यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तातडीने नियंत्रण करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व उद्योग व कारखाने (ता.३१) मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी दिले आहेत.मात्र, औषधी निर्माण करणाऱ्या, वैद्यकीय साहित्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, सॅनिटायझर, साबण, जंतुनाशक, हॅंडवॉश करणाऱ्या कंपन्या, कृषी उत्पादनावर प्रक्रिया, अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या कंपन्या, उद्योग व्यवसाय यांना यातून वगळण्यात आले आहे.