नांदेड : शहर वाहतुकीला आता टोईंगचा आधार 

nanded
nanded

नांदेड : शहरातील रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकीला सुरळीत करण्यासाठी नव्याने पुन्हा एका नव्या टोईंग कंत्राटदारांना हे काम दिले आहे. दोन टोईंग वाहने शहरभर फिरून बेशिस्त वाहनांना शिस्त लावून दंडात्मक कारवाई करणार आहे. वाहतुक शाखेला या टोईंगचा चांगलाच फायदा होणार असून वाहनधारकांनी संबंधीत कर्मचाऱ्यांना वाद न घालता वाहतुक शाखेला सहकार्य करावे. तसेच वाहनधारकांनाही टोईंग कर्मचाऱ्यांनी वेठीस धरु नये अशा सुचना परिविक्षाधीन डीवायएसपी कु. अश्‍विनी शेंडगे यांनी दिल्या आहेत. 

शहर वाहतुक शाखेच्या मैदानावर सोमवारी दोन टोईंग वाहनांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाल्यानंतर त्या बोलत होत्या. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरविणाऱ्या वाहनधारकांना अगोदर सुचना देऊन तो एेकला नाही तर त्याचे वाहन उचलून आणू शकता. परंतु तुमच्या आवाजाला त्यांनी प्रतिसाद दिला तर ते वाहन आपल्या ताब्यात घेऊ नये. वाहनधाराकांनीही टोईंग कर्मचारी व वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, कारण शहराची सुंदरता व शांतता आपल्या हातात आहे. मागील पाच महिण्यापासून शहरातील जुन्या टोईंग कंत्राटदाराची मुदत संपली होती. त्यानंतर नवीन प्रक्रिया राबवून पुन्हा हे काम खाजगी व्यक्तीकडे देण्यात आले. सोमवारपासून शहरातील बेशिस्त लावलेले वाहन उचलण्यात येणार आहे. दोन वाहनापैकी एक वाहन ईतवारा उपविभाग तर दुसरे वाहन शहर उपविभागात कार्यरत राहणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला काकासाहेब रोडके, टोईंग कंत्राटदार श्री. स्वप्नील वाघ यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि टोईंग कर्मचारी उपस्थित होते. 

शहरातील वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतुक शाखेचे अधिकारी व कर्मचारी सतत प्रयत्न करीत आहेत. शहरातील रस्त्यांची रुंदी व वाहनांची संख्या जास्त झाल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. तरीसुध्दा वाहतुक कर्मचारी सतत रस्त्यावर उभा राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. नांदेडकरांनी वाहतुक शाखेला सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com