कराडांच्या माघारीने जगदाळेच्या समर्थकांचा नळदुर्गमध्ये जल्लोष

भागवत सुरवसे
सोमवार, 7 मे 2018

सायंकाळी शहरातील प्रत्येक चौकात अशोक जगदाळेंच्या रूपाने नळदुर्गचा आमदार होण्याचे स्वप्न साकार होणार याबाबत चर्चा सुरू होती.

नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) - राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याच्या बातमीनंतर अपक्ष उमेदवार तथा नळदुर्गचे उद्योजक आशोक जगदाळे यांच्या समर्थकांकडून शहरातील चौकाचौकात फटाके फोडून स्वागत करत एकच जल्लोष केला. तसेच सायंकाळी शहरातील प्रत्येक चौकात अशोक जगदाळेंच्या रूपाने नळदुर्गचा आमदार होण्याचे स्वप्न साकार होणार याबाबत चर्चा सुरू होती.

मुळचे नळदुर्ग (ता.तुळजापूर) येथील रहिवासी आसलेले आशोक जगदाळे हे राष्ट्रवादीकडून इच्छूक होते व मागील तीन ते चार महिन्यापासून उस्मानाबाद- लातूर-बीड हा विधानपरिषद मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला होता. माञ ऐनवेळी रमेश कराड यांनी उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारीही देण्यात आली. त्यामुळे जगदाळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

आज सोशल मीडियावार कराड यांनी माघार घेतल्याची पोस्ट फिरत होती व ती अफावा आसल्याचेही बोलले जात होते. मात्र दुपारी 3 वाजता ही बातमी खरी ठरली आणि जगदाळे समर्थकांनी जल्लोष केला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The supporters of Jagdale