esakal | 'पवार कुटुंबाचे इतर पक्ष आणि राजकीय नेत्यांशी उत्तम संबंध'
sakal

बोलून बातमी शोधा

supriya sule

'पवार कुटुंबाचे इतर पक्ष आणि राजकीय नेत्यांशी उत्तम संबंध'

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद: ‘‘सायबर क्राइमचे प्रकार वाढले असून, त्याचा महिलांनाच अधिक त्रास आहे. या त्रासातून महिलांना वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे’’, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. लोकसंवाद फाउंडेशनच्या ऑनलाइन संवादमालेत ‘परिवर्तनवादी महाराष्ट्र’ या विषयावर त्या रविवारी (ता. १८) बोलत होत्या; तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘यशस्वीनी’ हा उपक्रम महिलांसाठी राबविण्यात येतो. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

पवार कुटुंबाचे इतर पक्षांशीही चांगले संबंध-
पवार कुटुंबाचे प्रत्येक राजकीय पक्ष, विचारधारा असलेल्या लोकांशी, राजकीय नेत्यांशी उत्तम संबंध आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र, आता कुठे तरी ही संस्कृती बिघडविण्याचे काम काही काळात झाले होते. त्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सुधारणा झाल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

हेही वाचा: औरंगाबादेत लष्करी जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘कृषी कायद्यावर संसदेत व्यापक चर्चा घेण्यात आली नाही. उद्यापासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यात याविषयीचे प्रश्न उपस्थित होतील.’’ महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून आपल्याकडे महाराष्ट्र पाहतो, असा प्रश्न सुळे यांना विचारला असता, त्यांनी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहते असे सांगितले. मुख्यमंत्री पदाला एक वेगळा वारसा आहे. एका जेंडरमध्ये त्यास अडकवून ठेवणे योग्य होणार असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: ग्रामीण भाग कोरोना मुक्तीकडे, आठवड्याभरात ४ तालुक्यांत शून्य रुग्ण

प्रस्ताविकात फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे म्हणाले, देशात महाराष्ट्र हेच एकमेव पुरोगामी भूमिका घेऊन चालणारे राज्य आहे. या राज्याने घेतलेल्या भूमिका सर्वांना स्वीकारावी लागते. त्यामुळे ही पुरोगामी भूमिका अधिक रुजविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. गणेश मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हंसराज जाधव यांनी आभार मानले. डॉ. नरेंद्र काळे, नीलेश राऊत, डॉ. शिवाजी मदन, डॉ. अशोक तेजनकर, डॉ. चेतना सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.

loading image