सुरेश पुरी म्हणजे पत्रकारांचे विद्यापीठच

राज्यमंत्री बनसोडे ; जीवनगौरव पुरस्काराचे वितरण
JALNA
JALNASAKAL

उदगीर : ‘प्रा. सुरेश पुरी म्हणजे पत्रकारांचे विद्यापीठच आहेत. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून अनेक पत्रकार घडविले’, असे गौरवोद्गार संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी काढले.

येथील उदगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या सभागृहात रविवारी (ता.२६) तालुका पत्रकार संघातर्फे मराठवाडास्तरीय पुरस्कार वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे, सचिव दयानंद बिरादार आदी उपस्थित होते.

तालुका पत्रकार संघातर्फे प्रा. पुरी यांना जीवनगौरव तर ‘सकाळ’चे उमरगा बातमीदार अविनाश काळे यांना उत्कृष्ट वार्ता गटात प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. शोध व उत्कृष्ट वार्ता गटातील शंकर बिराजदार, हणमंत केंद्रे, बापू नाईकवाडे, विनोद गुरमे, ज्योतिराम पांढरपोटे या पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.

उदगीरला उपजिल्हा माहिती कार्यालय आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू. उदगीर येथे पत्रकार भवन व त्यासाठी आवश्यक असणारी जागा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन बनसोडे यांनी दिले.

प्रा. पुरी म्हणाले, ‘‘विद्यार्थी जीवनात चांगले विद्यार्थी मिळाल्यानेच अधिक काम करण्याची संधी मिळाली. काम करण्याचा हुरूप आला. मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नोकर भरती होत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी मंत्रिमहोदयांनी पुढाकार घ्यावा.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com