या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाच लाखांची खंडणी! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पोलिसांनी सापळा रचून खंडणी मागणाऱ्यांना पकडण्याची युक्ती आखली व पाचशेच्या नोटांच्या आकाराचे कागदी बंडल तयार केले. ते एका पॉकीटामध्ये पॅक करुन पालवे यांच्याकडे दिले. हेच बंडल पालवे यांनी संशयित अमीतकुमार सिंग याला देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे अमितकुमार सिंग त्याच्या चारचाकी कारमधून विद्यानगर येथे आला. त्यावेळी त्याचा साथीदार दुसऱ्या वाहनातून आला. त्यानंतर येथीलच जागृत हनुमान मंदीराजवळ पालवे यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांनी नोटा असल्याचे भासवत कागदी बंडल दोघांच्या हाती टेकविले.

औरंगाबाद - शाळेबाबत माहिती अधिकारातून माहिती मिळवून त्याद्वारे 25 लाखांची खंडणी मागत तडजोडीअंती पाच लाख घेताना दोघांना पकडण्यात आले. यातील दोन्ही संशयित समाजवादी पक्षाचे पदाधिकारी असून ही कारवाई पुंडलिकनगर पोलिसांनी विद्यानगर येथे बुधवारी (ता. चार) केली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अमीतकुमार अनिलकुमार सिंग (वय 28, रा. कुंज तहसिल जि. नवादा, बिहार, ह. मु. पडेगाव) व प्रशांत राम वाघरे (वय 29, रा. लिंबगाव, ता. जि. नांदेड, ह. मु. सातारा परिसर) अशी संशयितांची नावे आहेत. यातील अमीतकुमार समाजवादी पक्षाचा जिल्हा महासचिव असल्याचे तर प्रशांत वाघरे हा पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयितांकडे पक्षाचे लेटरहेडही सापडले असून त्यांनी विविध सरकारी कार्यालयातही समाजवादी पक्षाच्या लेटरहेडचा वापर केल्याचे आढळले. 

याबाबत सुनील एकनाथ पालवे (वय 49, रा. अंबिकानगर, गारखेडा) यांनी तक्रार दिली. त्यानुसार त्यांच्या औरंगाबाद शहर व जिल्ह्यात अकरा शासनमान्य शैक्षणिक संस्था आहेत. गत दोन महिण्यांपासून अमीतकुमार सिंग व प्रशांत वाघरे हे दोघे पालवे यांना खंडणीची मागणी करीत होते. खंडणी मागण्यापुर्वी संशयितांनी पालवे यांच्या गारखेड्यातील वंडर गार्डन प्राथमिक शाळेची शिक्षणाधिकारी कार्यालयातून माहिती घेतली होती. या शाळेची माहिती उघड न करण्यासाठी त्यांनी पंचवीस लाखांची मागणी केली. तडजोडीअंती पालवे व त्यांच्यात पाच लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र यानंतर पालवे यांनी संशयितांविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार दिली.

त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणी मागणाऱ्यांना पकडण्याची युक्ती आखली व पाचशेच्या नोटांच्या आकाराचे कागदी बंडल तयार केले. ते एका पॉकीटामध्ये पॅक करुन पालवे यांच्याकडे दिले. हेच बंडल पालवे यांनी संशयित अमीतकुमार सिंग याला देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे अमितकुमार सिंग त्याच्या चारचाकी कारमधून विद्यानगर येथे आला. त्यावेळी त्याचा साथीदार दुसऱ्या वाहनातून आला. त्यानंतर येथीलच जागृत हनुमान मंदीराजवळ पालवे यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांनी नोटा असल्याचे भासवत कागदी बंडल दोघांच्या हाती टेकविले.

यानंतर पोलिसांनी संशयित दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून पॉकीट जप्त केले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक घनशाम सोनवणे, उपनिरीक्षक रावसाहेब मुळे, हवालदार रमेश सांगळे, विठ्ठल फरताळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रवीण मुळे, दीपक जाधव, नितेश जाधव, चालक शेख अत्तार व शिवा बुट्टे, संतोष बांधक, स्वप्निल विटेकर यांनी केली. 

चष्म्याचा इशारा आला कामी 

पोलिसांनी आधीच पालवे यांना युक्ती सांगितली होती. बंडल संशयितांना देताच डोळ्यावरील चष्मा काढायचा अर्थात पैसे दिल्याचा तो संदेश पोलिसांना मिळणार होता. त्यानंतर इशारा करताच पोलिस पकडणार होते. अगदी तशाच पद्धतीने सारा प्रकार पालवेकडून झाला आणि सापळा यशस्वी झाला. 

हेही वाचा : या जिल्ह्यात कांद्याने गाठली शंभरी 
 

संशयितावर यापुर्वी गुन्हे 

संशयित अमीतकुमार सिंग याच्याविरुद्ध जिन्सी व बेगमपुरा पोलिस ठाण्यात यापुर्वी गुन्ह्याची नोंद आहे. तो रेकार्डवरील असल्याची बाब पोलिसांकडून सांगण्यात आली. त्याच्यासह प्रशांतलाही पोलिसांनी अटक केली.  

हेही वाचा : ओळख, प्रेम आणि अत्याचार...असा झाला शेवट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspect arrested for ransom case