
अजब ! पोलिसांना ठेंगा दाखवून आरोपी गेला पळून, दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल
चाकूर (जि.लातूर) : खूनाच्या गुन्ह्यात संशयित असलेल्या व्यक्तीने हातकडी तोडून पोलीस ठाण्यातून पळ काढल्याची घटना गुरूवारी (ता.२४) पहाटे घडली. याबाबत पोलीसांनी मात्र असे घडलेच नसल्याचा कांगावा केला. परंतू खूनातील मृताच्या नातेवाईकांनी वरिष्ठांकडे तक्रार करताच तब्बल ३० तासानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चापोली (ता.चाकूर) येथील शिवारात (Chakur) काही दिवसांपूर्वी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आले होते. सदरील मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तो शिरूर ताजबंद (ता.अहमदपूर) येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. (Suspect Ran Away From Police Station, Case Filed On Second Day In Chakur In Latur)
हेही वाचा: पेन चोर भाजपा ! भ्रष्टाचारावरुन नाना पटोले यांचा भाजपला टोला
यात संशयित असलेल्या व्यक्तींची पोलीसांकडून चौकशी केली जात आहे. शिरुर ताजबंद येथील अनेकांना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस कोठडीमध्ये दहावी व बारावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका असल्यामुळे एका संशयित व्यक्तीला हातकडी लावून कोठडीजवळ बसविण्यात आले होते. गुरूवारी पहाटे पाचच्या सुमारास कर्मचारी नसल्याचा फायदा घेत संशयित व्यक्तीने हातकडी काढून पोलीस ठाण्यातून पळ काढला. याची बातमी सर्वत्र पसरली परंतू पोलीस अधिकारी मात्र संशयित व्यक्ती पळून गेला नसल्याचा कांगावा करीत होते.
हेही वाचा: दोन जिवलग मित्रांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार, गावात चूलच पेटली नाही
खूनातील मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी लातूर येथे जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार दिली. यानंतर मात्र शुक्रवारी (ता.२५) दुपारी पोलीस कर्मचारी सुरेश गड्डीमे यांच्या फिर्यादीवरून संशयित व्यक्तीविरूध्द पळून गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपील पाटील हे करीत आहेत. (Latur)
Web Title: Suspect Ran Away From Police Station Case Filed On Second Day In Chakur In Latur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..