पेन चोर भाजपा ! भ्रष्टाचारावरुन नाना पटोले यांचा भाजपला टोला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे टीकास्त्र
नाना पटोले
नाना पटोलेe sakal

मुंबई : राज्यात भारतीय जनता पक्षाकडून दररोज महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. तसेच सत्ताधाऱ्यांकडून ही त्यांचा समाचार घेतला जातो. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर टीका केली असून त्यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लिहिलेले पत्र ट्विट केले आहे. ते म्हणतात, पेन चोर भाजपा. पत्रात शिंदे यांना पटोले लिहितात, नागपूर महापालिकेत ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. स्टेशनरी साहित्य, सॅनिटायझर, बेड, कुलर वाढीव दराने खरेदी केल्याचा प्रकार घडला आहे. महापालिकेकडील निधी म्हणजे जनतेचा पैसा असतो. महापालिका कर्मचारी व पदाधिकारी हे त्याचे विश्वस्त असतात. (Nana Patole Attack BJP Over Corruption In Nagpur Municipal Corporation)

नाना पटोले
जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो कायदेश्वर; भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

त्यांनीच भ्रष्टाचार केल्यामुळे कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडला आहे, अशी टीका त्यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर केली आहे. ते पुढे म्हणतात, महोदय या महापालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्या बड्या माशांना शोधणे आवश्यक आहे. कोणाच्या वरदहस्ताने हा भ्रष्टाचार झाला, याची पाळेमुळे शोधून त्यांना तुरुंगात डांबणे गरजेचे आहे.

नाना पटोले
देशात कोरोनाची चौथी लाट ? काही राज्यांमध्ये नवीन व्हेरिएंटचे रग्ण

आपण या प्रश्नी लक्ष घालून योग्य कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती पटोले यांनी नगरविकास मंत्री शिंदे यांना केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com