सोमवारी ४६ संशयितांचे स्वॅब अहवाल येणार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

रविवारी (ता. १९) नव्याने ४६ संशयितांच्या घशातील लाळेचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी देण्यात आली.

नांदेड: जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नसल्याने जिल्ह्याची दिलासादायक परिस्थिती आहे. रविवारी (ता. १९) नव्याने ४६ संशयितांच्या घशातील लाळेचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले, सोमवारी ४६ संशयितांचे स्वॅब अहवाल येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी देण्यात आली.

आतापर्यंत एकूण क्वारंटाइन असणाऱ्या नागरिकांची संख्या ६४९ आहे. यामधील क्वारंटाइन कालावधी पूर्ण झालेली १९६ असून सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात असलेल्या व्यक्तींची संख्या ३५ इतकी आहे. यापैकी रुग्णालयात क्वारंटाइनमध्ये असलेल्या व्यक्तींची संख्या ७३ इतकी आहे. तसेच त्यांच्या घरीच क्वारंटाइनमध्ये असलेल्या प्रवाशांची संख्या ५७६ आहे. आजपर्यंत एकूण ३७३ नमुने तपासणी झाली आहेत. यापैकी ३२० स्वॅब नमुने निगेटिव्ह आले असून ४८ नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे.
जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी ७६ हजार २११ इतकी असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे.

हेही वाचा- लॉकडाऊन ही दारूपासून मुक्तीची संधी

अशी आहे आकडेवारी

आतापर्यंत एकूण क्वारंटाइन -६४९
क्वारंटाइन कालावधी पूर्ण - १९६
अजून निरीक्षणाखाली असलेले - ३५
पैकी दवाखान्यात क्वारंटाइनमध्ये - ७३
घरीच क्वारंटाइनमध्ये असलेले - ५७६
आज तपासणीसाठी नमुने घेतले- ४६
एकूण नमुने तपासणी- ३७३
पैकी निगेटिव्ह - ३२०
नमुने तपासणी अहवाल बाकी- ४८
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- शून्य
नाकारण्यात आलेले नमुने - पाच

हेही वाचा- Video: लॉकडउननंतर मिळणार ‘सोशल डिस्टन्स’चा नवा संस्कार
या आश्रमाने केली मुख्यमंत्री निधीस एक लाखाची मदत

श्री संत पाचलेगावकर महाराज यांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान राहिले आहे. त्यांचे हे सामाजिक कार्य सामुदायिक विवाह मेळावा, कन्यादान, अशा विविध कामातून आजही अविरतपणे सुरूच आहे. देशावर कोरोनाचे संकट ओढवल्याने मुख्यमंत्री सहायता निधीस मदतीचा हात पुढे केला आहे.

नांदेड : श्री संत पाचलेगावकर महाराज मठ संस्थान हे नेहमीच सामाजिक कार्यात योगदान देत आले आहे. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या आवाहनास प्रतिसाद देत श्री संत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रमाच्या वतीने नुकतेच एक लाख ११ हजार एकशे अकरा रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधास करण्यात आली.

आश्रमाचे अध्यक्ष सुधार टाक व विश्वस्त श्रीमती गयाबाई लांगे यांनी उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाख यांच्याकडे एक लाख ११ हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या वेळी चंद्रभान पाटील जवळेकर, सतीश किन्हाळकर, रुपेश टाक व दत्तोपंत डहाळे यांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A swab report of six suspects will be released on Monday Nanded News