लॉकडाऊन ही दारूपासून मुक्तीची संधी 

संग्रहित चित्र.
संग्रहित चित्र.

जालना - दारू शरीरासाठी घातक मात्र, या मद्यपानाची सवय जडलेल्या व्यक्तींना लॉकडाऊनमध्ये मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, हा काळच या व्यसनापासून मुक्त होण्याचा सुवर्णकाळ आणि चांगली संधी असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगत आहे. 

जिल्ह्यात सर्व प्रकारची मद्य विक्रीचे दुकाने बंद करण्यात आले आहे. त्यामुळे इंग्लिश पिणारे आता हातभट्टीवर आले आहेत. या दारूसाठी वस्त्यांमध्ये शोध घेत आहेत. अशीच काहीशी स्थिती तंबाखूबाबत झालेली आहे.

लॉकडाऊनमुळे जिल्हाभरात तंबाखूचा तुटवडा निर्माण झाला. विविध ब्रॅन्डच्या तंबाखू खाणारे गावरान तंबाखूवर आपली तलफ भागवत आहे.

मात्र, शरीराला लागलेल्या या वाईट सवयीपासून मुक्त होण्यासाठी सध्याचा लॉकडाऊनचा काळ त्यासाठी सुवर्णसंधी असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

मादक पदार्थांचे नियमित सेवन करणाऱ्या किंवा त्याची सवय असलेल्या व्यक्ती तसेच तरुणांना लॉकडाऊनचा काळ व्यसन सोडवण्यासाठी चांगला आहे. या काळात मादक पदार्थांचा शोध घेणे थांबून व्यसन मुक्ती केंद्रातील समुपदेशकांचा सल्ला घ्यावा. योग्य ती औषधे घेऊन आपल्या मनावर नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. 
- डॉ .जावेद कादरी, 
मानसशास्त्र विभाग प्रमुख 

दारुचे व्यसन करणाऱ्या व्यक्तीला दारू न मिळाल्यास तीन- चार दिवसांनी हाताचा थरकाप होणे, झोप न लागणे, विचित्र स्वप्न पडणे, छातीत धडधड होणे, घबराट होणे असे आदी लक्षणे दिसून येतात. काहींमध्ये दहा दिवसांनंतर ही लक्षणे कमी होतात. दारूचे व्यसन सोडण्यासाठी लॉकडाऊन हा सुवर्णकाळ आहे. त्यामुळे दारू न पिता त्रास सुरू झाल्यास योग्य औषधोपचार करून या व्यसनापासून दूर राहता येते. 
- डॉ. प्रकाश अंबेकर, मानसोपचार तज्ज्ञ 

असे राहता येईल दारूपासून दूर 

  • वेळेवर जेवण केल्याने दारू पिण्याची इच्छा कमी होते.त्यामुळे भरपूर पाणी पिणे व जेवण करायला हवे. 
  • लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नये. ज्या ठिकाणी दारू मिळते तसेच ती पिणाऱ्या व्यक्तीसोबतही राहू नये. दारूची सर्वाधिक आठवण सायंकाळी येते. त्यामुळे या वेळेला जेवण केल्यास दारूची आठवण येणार नाही. 
  • दारू सोडल्यानंतर दारू पिणाऱ्या व्यक्तीसोबत कुठे जाऊ नये तसेच राहू नये. 
  • लॉकडाऊनच्या काळात दारू पिण्यात जाणारा वेळ वाचल्यानंतर आपला व आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार करण्याचा हा चांगला काळ आहे. 
  • सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, एखादा छंद जोपासणे अशा सवयी लावून घेऊन दारूपासून कायमच मुक्त होता येणेसहज शक्य आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com