Video: लॉकडउननंतर मिळणार ‘सोशल डिस्टन्स’चा नवा संस्कार

Nanded Photo
Nanded Photo

नांदेड : इतर देशाच्या तुलनेत भारताला भविष्यात आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या दोन गोष्टींवर सर्वाधिक भर द्यावा लागेल. कोरोना हा न दिसणारा विषाणूजन्य आजार आहे. त्यावर योग्य औषधोपचार अजुनही सापडले नाही. कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरला नाही, हे खरे असले तरी ‘लॉकडाउन’नंतरचे जग वेगळे असेल. नवीन संस्कार आपल्यावर पडलेला असेल, असे मत डॉ. करुणा पाटील यांनी व्यक्त केले.

हॉस्पीटलमध्ये सोशल डिस्टन्स मॅनेजमेंट हवे इतर वेळा आपण हॉस्पीटलमध्ये केवळ मॅनेजमेंट हा विषय तिक्या गंभीरतेने घेत नव्हतो. यापुढे शासकीय रुग्णालय असोत वा खासगी त्यामध्ये सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी मॅनेजमेंटला काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागणार आहे. त्यानुसार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नोंदी घेऊन त्यानुसार त्यांना गर्दी न करता ठराविक अंतराने रुग्णास बोलावून त्यांची तपासणी करावी लागणार आहे. यासाठी नेहमी हॅण्डग्लोज आणि मास्कचा वापर करावा. शिवाय रुग्णासोबत एकच नातेवाईक अशी अट ठेवून प्रत्येकाच्या तोंडाला मास्क असणे बंधनकारक करावे लागणार आहे.

हेही वाचा- शासकीय कार्यालयांमध्ये सोमवारपासून दहा टक्के उपस्थिती 

घरात येणाऱ्या कामवाल्या बाईला जपा

आपण आपली आणि आपल्या कुटुंबियांची जशी काळजी घेतो, अगदी तशीच काळजी आणि खबरदारी घरात धुणे भांडी, किंवा स्वंयपाकासाठी येणाऱ्या कामवाल्या बाईची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांचे हात सॅनेटायझेशन, घरात वेगळी चप्पल, अंगावरचे कपडे स्वच्छ अशी खबरदारी घेतली तरच कोरोनापासून परीवारास वाचवू शकु.

हेही वाचा- सोशल डिस्टंन्सिंग, महाराष्ट्राच्या मानचिन्हाचे !
गाफील राहून चालणार नाही

लॉकडाउन संपले, आता कोरोना आपल्याकडे कसा येईल? या विचारात राहून चालणार नाही. प्रवाशांनी अजिबात रिस्क घेऊ नये. तर आपल्यामुळे गर्दी होणार नाही. यासाठी सर्वांनी खबरदारी घणे गरजेचे आहे. बसमध्ये चढताना, उतरताना किंवा बस व रेल्वे स्थानकावर जाताना मास्कचा वापर करावा, गर्दी करणे टाळावे.

 

पाळीव प्राण्यची घ्यावी काळजी
अनेक हाय प्रोफाईल कुटुंबात पाळीव प्राण्यलाही कुटुंबातील सदस्याप्रमाणे स्थान असते. तेव्हा या प्राण्यांना बाहेर फिरण्यास घेऊन गेल्यास ते उघजड्यावर घान करतात. नको त्या ठिकाणी तोंड लावतात. तेव्हा घरामध्ये सदस्यांप्रमाणे वावरणाऱ्या या प्राण्यांना देखील मास्क वापरावा लागणार आहे. अन्यथा त्यांच्यामुळे सुद्धा कोरोना घरात येऊ शकतो, असेही डॉ. करुणा पाटील यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com