लातुरात आज स्वाभिमान संघर्ष महा मूकमोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

लातूर - आरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी व ओबीसी आरक्षण बचाव या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी (ता. 15) येथे स्वाभिमान संघर्ष महा मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात दलित, ओबीसी, भटके विमुक्त, मुस्लिम, आदिवासी सहभागी होणार आहेत. मोर्चात सहभागी होणारी संख्या लक्षात घेता मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्ताचा अप्पर पोलिस अधीक्षक लता फड यांनी सोमवारी (ता. 14) आढावा घेऊन पोलिसांना महत्त्वाच्या सूचना केल्या. 

हा मोर्चा जिल्हा क्रीडा संकुलातून दुपारी बारा वाजता सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. तेथे समाजातील मुली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. हे निवेदन वाचून दाखविले जाणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

दरम्यान या मोर्चाला होणारी गर्दी पाहता जिल्हा पोलिस दलही सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील, तसेच इतर जिल्ह्यांतील पोलिस अधिकारी व पोलिस येथे दाखल झाले आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक लता फड यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला, त्यांनी पोलिसांना महत्त्वाच्या सूचना केल्या. 
शहरातील सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, बाहेरगावाहून आलेल्या वाहनांची पार्किंग व्यवस्थित करावी, वाहनांची कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी या वेळी केल्या. शहरात मोर्चाच्या काळात 175 बॅरिकेटस उभारण्यात आले आहेत. दरम्यान श्री. चव्हाण यांनी जिल्हा क्रीडा संकुला भेट देत तेथील बंदोबस्ताची पाहणी केली. या मोर्चासाठी एक पोलिस अधीक्षक, एक अप्पर पोलिस अधीक्षक, तीन पोलिस उपअधीक्षक, 17 पोलिस निरीक्षक, 44 पोलिस उपनिरीक्षक, 11 महिला पोलिस अधिकारी, 605 पोलिस कर्मचारी, 70 महिला पोलिस कर्मचारी, 22 वाहतूक पोलिस, तीन आरसीपी प्लाटून, क्‍युआरटीचे दहा पोलिस कर्मचारी असणार आहेत. बाहेरून आलेले चार पोलिस निरीक्षक, आठ पोलिस उपनिरीक्षक, 70 पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार आहेत.

Web Title: swabhiman sangharsh maha muk morcha