स्वाभीमानीचे डब्बा खात अग्रणी बॅंकेत आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

परभणी : पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले. 
कर्जमाफीतील लाभार्थ्यांच्या याद्या सर्व बॅंका आणि ग्रामपंचायत समोर लावुन यंदाच्या पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले.

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 4.05 टक्के कर्ज वाटप झाले आहे.पिक कर्जासाठी बॅंकेत जाणाऱ्या शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांकडून पिटाळुन लावल्या जात असल्याचा आरोप करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने तातडीने पिक कर्ज वाटपाची मागणी केली आहे. तसेच कर्जमाफीतील लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालय आणि बॅंकेसमोर लावावी अशी मागणी मागील काही दिवसापासून संघटना करीत आहे. याच मागणी साठी मंगळवारी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अग्रणी बॅंकेत सकाळी वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरु केले. मात्र बॅंकेतील अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने 

कार्यकर्त्यांनी दुपारी दीड  वाजता आंदोलन सुरु ठेवत बॅंकेतच सोबत आणलेले डबे सोडत भोजन केले. अखेर साडे तीन वाजता बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेत लेखी अश्वासन देत आंदोलनावर पडदा टाकला. आंदोलनात जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, जिल्हा उपाध्यक्ष केशव आरमळ, डिंगबर पवार, बालाजी मोहिते आदी सहभागी झाले होते.

Web Title: Swabhimani protest against bank