
हिंगोलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पिकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड
हिंगोली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील एनटीसी भागात असलेल्या पिकविमा कंपनीच्या कार्यालयात अद्याप पिकविमा मिळाला नसल्याने संतप्त होत बुधवारी (ता.दोन) तोडफोड करण्यात आली. स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी कृषी कार्यालयात आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना एका महिन्यात पिकविमा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र कालावधी झाला तरी पिकविमा (Crop Insurance) मिळाला नाही. या संदर्भात २८ जानेवारी रोजी पिकविमा देण्यासाठी निवेदन देऊन दोन फेब्रुवारी पूर्वी पिकविमा मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र पिकविमा मिळाला नसल्याने संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पिकविमा कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. (Swabhimani Shetkari Sanghatana Vandalised Crop Insurance Company Office In Hingoli)
हेही वाचा: कारागृहात कैद्यांनी मेहनतीने फुलवली शेती
अधिकाऱ्यांनी पिकविम्या संदर्भात माहिती विचारली. मात्र उडवाउडवीची (Hingoli) उतरे देण्यात आली. तसेच मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी कार्यालयात खुर्च्याची तोडफोड केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब अडकिणे, संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पंतगे, संतोष सावके, विठ्ठल सावके, संजय सावके, गोपाल सावके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana Vandalised Crop Insurance Company Office In Hingoli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..