मोसंबी उत्पादक शेतकरी पुरता हतबल, बाजारात मिळेना भाव

बाबासाहेब गोंटे
Monday, 7 September 2020

जालना जिल्ह्यात अंबड तालुका मोसंबी उत्पादनात मोठ्या प्रमाणात अग्रेसर आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी मोसंबी फळबागांची लागवड करून उत्पन्नाचे स्वप्न उराशी बाळगून आहे. मात्र सततचा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, जाणवत गेलेली भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी यावर मात करत गत अनेक वर्षांपासून जोपासलेल्या फलबागातून भरपूर उत्पन्न मिळेल अशी आशा मोसंबी उत्पादक बाळगून होते.

अंबड (जि.जालना) : जालना जिल्ह्यात अंबड तालुका मोसंबी उत्पादनात मोठ्या प्रमाणात अग्रेसर आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी मोसंबी फळबागांची लागवड करून उत्पन्नाचे स्वप्न उराशी बाळगून आहे. मात्र सततचा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, जाणवत गेलेली भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी यावर मात करत गत अनेक वर्षांपासून जोपासलेल्या फलबागातून भरपूर उत्पन्न मिळेल अशी आशा मोसंबी उत्पादक बाळगून होते. यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.

शेतात काहीच करमना गेलंय, सोयाबीन पण हाती लागणार नाही?

विहीरी, कूंपनलिका यांची पाणीपातळीत भरघोस वाढ झाल्याचे एकीकडे समाधान वाटत आहे. दुसरीकडे मोसंबीची गळ होऊन झाडाखाली मोसंबी फळाचा सडा पडत आहे. बाजारात मोसंबीला योग्य भाव मिळत नाही. यामुळे मोसंबी विक्री अभावी तशीच झाडाला लटकून राहिलेली आहे. कोरोना जागतिक महामारीचे संकट पाठीशी लागल्याने मृग बहर विक्री न झाल्याने अनेकांचा मोसंबी फळ तसाच झाडाला लटकून राहिला. शेवटी तोडून बांधावर फेकून देण्याची केविलवाणी वेळ मोसंबी उत्पादकांवर आली होती.

बाजारात मिळेना मोसंबीला भाव
बाजारात मोसंबीला म्हणावा तसा योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. बाजारात मोसंबीला सध्या सरासरी दहा ते पंधरा हजार रुपये टनाला भाव मिळत आहे. भावात वाढ होईल, अशी आशा शेतकरी बाळगून आहे. एकीकडे दुष्काळ, भीषण पाणीटंचाई, नैसर्गिक आपत्ती याचा सामना करत असताना कोरोनाने घाला घातल्याने होत्याचे नव्हते झाले आहे. यामुळे मोसंबी उत्पादक अखेर पुरता हतबल झाला आहे. मोसंबी फळाची मोठ्या प्रमाणात गळ तसेच फळावर काळे डाग पडलेल्या मोसंबीला बाजारात टनाला पाच ते सात हजार रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नाही. यामुळे केलेला खर्चही वसूल होत नाही.

आदित्यच्या उपचारासाठी ‘युगंधर’तर्फे सव्वालाख, मदतीसाठी सरसावले शेकडो हात

 

गत अनेक वर्षांपासून सतत अस्मानी व सुलतानी संकट झेलत पाणीटंचाईचा सामना करत असताना आता जागतिक कोरोना महामारीचे संकट पाठीशी लागल्याने मोसंबीचे भाव बाजारात गडगडल्याने अखेर अपेक्षाभंग केला आहे.
कृष्णा वरे, मोसंबी उत्पादक
 

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sweet Lime Grower Farmers Unhappy With Prices