उदगीरात विनाकारण फिरणाऱ्या पंधरा दुचाकी, दोन रिक्षा जप्त

उदगीरात विनाकारण फिरणाऱ्या पंधरा दुचाकी, दोन रिक्षा जप्त

उदगीर (जि.लातूर) : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शहरात विनाकारण फिरणाऱ्या पंधरा दुचाकी व दोन रिक्षा तहसिलदारांनी जप्त केल्या. दोन दिवसांपूर्वी निलंगा येथे सापडलेल्या आठ कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांच्या पार्श्वभूमीवर उदगीर शहर व तालुक्यामध्ये सतर्कता पाळण्यात येत आहे. महसूल प्रशासन, पोलिस विभाग, आरोग्य विभाग व नगरपालिका सतर्क झाली आहे. अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यास सुरवात झाली आहे.


रविवारी (ता.पाच) तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, शहर पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना सोबत घेऊन सायंकाळच्या सुमारास शहरातील रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारक नागरिकांची कसून चौकशी सुरू केली. यात विनाकारण फिरत आहेत अशा पंधरा दुचाकी व दोन रिक्षा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील विविध गल्लीबोळात नगरपालिकेच्या वतीने मोठी खबरदारी घेण्यात आली असून निर्जंतुकीकरण करण्यासाठी आवश्यक त्या फवारण्या करण्यात येत आहेत.

शहरातील मुख्य रस्त्यावर कोरोना संसर्गजन्य प्रतिबंधासाठी आवश्यक देण्यात आले आहेत. जेणेकरून नागरिकांमध्ये जनजागृती होईल. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या वतीने काळजी घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी राठोड हे वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत. निलंग्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. गरज असेल तरच घराबाहेर निघा. अन्यथा विनाकारण रस्त्यावर गर्दी करणे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावर विविध ठिकाण नाकाबंदी लावण्यात आली असून फिरणाऱ्या नागरिकांची व वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

  वाचा ः बारा जण निलंग्यात आलेच कसे? मंत्री देशमुखांची चाैकशीची मागणी

वाहन जप्तीची कार्यवाही तीव्र करणार
कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली संचारबंदी नागरिकांसाठीच आहे. नागरिकांनी सुरक्षित राहावे, विनाकारण रस्त्यावर फिरू नये. अनेक नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत आहेत. असे नागरिक आढळून आल्यास त्यांच्यावर व त्यांच्या वाहनावर जप्तीची कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे असे तहसीलदार मुंडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com