शालेय पोषण आहाराचे 13 नमुने गोडाऊनमधून ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

नांदेड : शालेय पोषण आहार वाटप करणाऱ्या गुंडेगाव येथील राजेंद्र गोडावूनच्या विविध प्रकारच्या शालेय पोषण आहाराच्या नमुन्याची तपासणी राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीने काल ता.११ रोजी केली. राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांच्या सह अन्य कर्मच्याऱ्यांनी अचानक भेट देऊन नमुने घेतले.

प्राप्त माहितीनुसार राजेंद्र ट्रेडींग कंपनी उस्माननगर रोड गुंडेगाव येथे गोडावून आहे.या गोडावून मधील ता ११ रोजी वेळ 2 ते 5 च्या दरम्यान शालेय पोषण आहारातील वटाना,गुळ,चणा,तांदूळ,मटकी,मीठ,मोहरी,रिफाईण्ड सोयाबीन तेल,कांदा,लसूण,मसाला,शेंगदाने आदीसह तेरा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

यावेळी अन्न भेसळ प्रशासनाचे सह आयुक्त के.आर.जयपूरकर,अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे,सु.द.जिंतूरकर,यांच्या सह कर्मच्या-यांची उपस्थिती होती दरम्यान तपासणी साठी औरंगाबाद येथे हे नमुने पाठविण्यात आले असून या पोषण आहारात काही दोष आढळल्यास त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती मिळाली आहे.

Web Title: take 13 samples from godown of nutrition food