हिंदू तरुणांवरील गुन्हे मागे घ्या : कोणी केली मागणी?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 December 2019

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या शहरात दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन दंगल भडकली होती. त्यामध्ये काही तरुणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकारातील हिंदू तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चातर्फे सोमवारी (ता.2) जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. 

भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन झवेरी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की या प्रकरणात अडकविण्यात आलेले तरुण महाविद्यालयीन असून काही तुटपुंजा व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याकारणाने या प्रकरणाचा निश्‍चित कालावधी माहीत नसल्याने त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे पुढील भवितव्य अंधारात आहे. प्रामुख्याने दंगलीचा फायदा कोणाला झाला हे आजही अज्ञात आहे. पण या शिक्षेमुळे नवतरूणांना त्रास सहन करावा लागत आहे, असेही यात म्हटले आहे.

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा विळ्याने गळा चिरला

महाराष्ट्र राज्य, गृह विभाग, फौजदारी प्रक्रिया दंड संहितेच्या कलम 321 नुसार राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याबाबत गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने दिलेल्या निर्णयास अनुसरून शहरातील हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

अरेरे - पतंग काढताना 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

यावेळी भाजपचे गुलमंडी मंडळ अध्यक्ष सुधीर नाईक, योगेश अष्टेकर, सुनील शरणागत, युवा मोर्चाचे शंतनू उरेकर, युवराज सिद्ध, अमित घनघाव, सतीश ताठे, आदित्य दहिवाळ, पंकज साखला, संदीप कुलकर्णी, केदार ठाकरे, राजू निसर्गंध, निनाद खोचे, सिद्धार्थ साळवे, राहुल नरोटे व पदाधिकारी उपस्थिती होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take Back Charges Filed on Hindu Youth of Aurangabad