परभणी - ‘अगोदर आमचा जीव घ्या, नंतर जमीन अधिग्रहीत करा’ असे म्हणत ३१ गावांतील शेतकऱ्यांनी जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला आहे.
श्री क्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या ३१ गावांतील प्रत्येकी दोन शेतकरी या शनिवारी आयोजित बैठकीस उपस्थित होते. शक्तिपीठ महामार्गाला जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध सुरू केला आहे.