कारवरील ताबा सुटून तलाठ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 December 2020

गोरे यांनी आष्टी तालुक्यात बरीच वर्षे तलाठी म्हणून काम पाहिल्यानंतर नुकतीच त्यांची पाटोदा तालुक्यात बदली झाली होती. शनिवारी (ता. 19) सकाळी शेरी बुद्रूक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आष्टी (बीड) : वळणावर ताबा सुटल्याने कारने दोन पलट्या घेतल्या. या अपघातात तालुक्यातील शेरी बुद्रूक येथील रहिवासी असलेले तलाठी पोपट गोरे यांचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. नगर-बीड राष्ट्रीय महामार्गावर कडा येथे शुक्रवारी (ता. 18) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

हे ही वाचा : ट्रॅक्टर व कारच्या अपघातात एक जण गंभीर जखमी

पाटोदा तालुक्यातील भायाळा सजावर कार्यरत असलेले तालुक्यातील शेरी बुद्रूक येथील रहिवासी पोपट गोरे शुक्रवारी कडा येथे कामानिमित्त कारने (एमएच-16 बीएच-5758) आले होते. रात्री उशिरा ते नगर -बीड रस्त्याने गावी निघाले असता कडा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या अलिकडे असलेल्या वळणावर त्यांचा कारवरील ताबा सुटला. कारने रस्त्याच्या खाली जावून दोन पलट्या मारल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

हे ही वाचा : उमरगा : मुंबईहून परतलेले वाहक आणि चालक पॉझिटिव्ह ; बसच्या प्रवासाची सुरक्षितता धोक्यात 

गोरे यांनी आष्टी तालुक्यात बरीच वर्षे तलाठी म्हणून काम पाहिल्यानंतर नुकतीच त्यांची पाटोदा तालुक्यात बदली झाली होती. शनिवारी (ता. 19) सकाळी शेरी बुद्रूक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचा-यांसह जनसमुदाय उपस्थित होता. या दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talathi died after losing control of his car near the MSEDCL office at Kada