esakal | दुचाकीवर बोलत जाणे बेतले जिवावर
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

दुचाकीला ट्रकची जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार, तर तिघे जखमी झाल्याची घटना घडली. यातील जखमी एकाची तब्येत गंभीर असल्याने त्यास नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

दुचाकीवर बोलत जाणे बेतले जिवावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : दुचाकीवर बोलत जात असलेल्या दुचाकीस्वारांच्या दुचाकीला एका ट्रकची जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार, तर तिघे जखमी झाल्याची घटना हिंगोली - वाशीम मार्गावरील कलगाव फाट्याजवळ रविवारी (ता. १७) सकाळी घडली.

हिंगोली तालुक्‍यातील भिरडा येथील शिवशंकर भगवान पुरी (वय ३७) हे हिंगोली येथे एका ठिकाणी वॉचमनची ड्युटी करून दुचाकीने रविवारी सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास भाऊ विश्वनाथ पुरी यांच्यासोबत घराकडे जात होते. 

हेही वाचा हिंगोलीला पुन्हा धक्का, वसमतचे आठ जण पॉझिटिव्ह

दोन्ही दुचाकी धावत होत्या सोबत

तसेच दुसऱ्या एका दुचाकीवर सदाशिव पुरी व अन्य एक, असे दोघेजण प्रवास करत होते. दोन्ही दुचाकी सोबत धावत असताना दुचाकीस्वारांचे बोलणे सुरू होते. दुचाकी कलगाव परिसरात आल्या असता या वेळी अचानक हिंगोलीमार्गे एक ट्रक भरधाव येत होता.

ट्रकची दुचाकीला धडक
 

 या ट्रकची कलगाव फाटा परिसरात शिवशंकर पुरी यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. यात ते चिरडल्या गेल्याने त्यांचा मृत्‍यू झाला. यावेळी शिवशंकर पुरी यांच्या सोबतचे तसेच दुसऱ्या दुचाकीवरील दोघेही खाली पडले. यात तेही गंभीर जखमी झाले.

पोलिसांची घटनास्थळी धाव 

तर या वेळी काही अंतरावर जाऊन ट्रकदेखील उलटला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बी. एच. कांबळे, पोलिस उपनिरीक्षक राहुल तायडे, राजेश ठोके, अशोक धामणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

एकाची प्रकृती गंभीर

 नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्‍याला नांदेड येथे पाठविण्यात आले असून दोघे हिंगोली येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. अपघाताची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

हिंगोलीत औषधी विक्रेत्यांचा बंद

हिंगोली : अत्‍यावश्यक सेवा पुरविणाऱ्या औषधी व्यावसायिकावरील दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासंदर्भात रविवारी (ता. १७) जिल्‍ह्यातील औंषधी विक्रेत्यांनी बंद पुकारत दुकाने बंद ठेवली.

येथे क्लिक करागॅस स्फोटात चार दुचाकीसह आखाडा जळून खाक

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

शहरातील आखरे मेडिकल ॲंड जनरल स्‍टोअर्सचे मालक मनोज आखरे यांच्यावर आपती व्यवस्‍थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत हिंगोली जिल्‍हा केमिस्‍ट व ड्रगिस्‍ट संघटेचे प्रमोद मुंदडा, संतोष बाहेती, मनोज आखरे, मिलिंद यंबल यांनी शुक्रवारी (ता.१५) जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांना निवेदन दिले.

गुन्हा मागे घेण्याची मागणी

दाखल झालेला गुन्हा तत्‍काळ मागे घ्यावा, अशी विनंती एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र, गुन्हा मागे घेतला नसल्याने रविवारी जिल्‍ह्यातील सर्व औषधी विक्रेत्यांनी बंद ठेवून आंदोलन केले. दरम्‍यान, या संदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनीदेखील शुक्रवारी (ता. १५) विभागीय आयुक्‍तांना निवेदन दिले होते. हिंगोली येथील औषधी व्यावसायिकांवर पोलिसांकडून होत असलेला अन्याय थांबवावा, अशी मागणी करण्यात आली होती.

loading image